Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का आज पण शनिवार वाडा किंचाळतो काका मला वाचवा ..

पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी! ऐतिहासिक वारसा लाभलेले एक महाराष्ट्रातील अग्रगण्य शहर. शिवरायांच्या प्रतापाचे आणि भारतभूमी पादाक्रांत करणाऱ्या बाजीराव पेशवेच्या समशेरीचे साक्ष शहर. आणि जिथे इतिहास आला तिथे कथा आल्या प्रसंग आले आणि आल्या अनेक मान्यता.



शनिवार वाडा म्हणजे पुण्याची अशी ऐतिहासिक वास्तू जिने ३५० वर्षांचे अनेक गुपिते आपल्या मध्ये सामावले आहेत. ह्याच शनिवार वाड्याशी एक कथा जोडली गेली आहे ती म्हणजे दर अमावस्या आणि पौर्णिमेला ह्यातून ऐकू येणार काळीज कापणारा आवाज ..

"काका मला वाचवा,काका मला वाचवा"

शनिवार वाड्यात नारायण राव पेशवे ह्यांची आत्मा भटकतं असते असे प्रत्येक पुणेकर मनोमन मानतोच. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. एक हाँटेड प्लेस म्हणजे भुतबाधित जागा म्हणून पण शनिवार वाड्याची ओळख आहेच! तब्बल १६,११० रुपये खर्च करून १७३० साली पुण्यातील कसबा पेठ आणि शनिवार पेठ ह्यांच्या मध्यावर शनिवार वाड्याचा पाय रचण्यात आला. २२ जानेवारी १७३२ साली ब्रह्मवृदांच्या साक्षीने आणि गणरायाच्या आशीर्वादाने पेशव्यांनी गृहप्रवेश केला होता .  


परंतु शनिवार वाड्याला नजर लागली ती अंतर्गत राजकारणाची आणि ३० ऑगस्ट,१७७३ मध्ये षोडश वर्षीय पेशवा नारायण राव ह्यांची हत्या होतांना ह्याच शनिवार वाड्याने पहिले आणि ऐकली ती आर्त जी आज इतिहास प्रसिद्ध आहे. "काका मला वाचवा,काका मला वाचवा" . धोक्याची चाहूल लागताच नारायण राव आपल्या शयानातून बाहेर पळत आले आणि भीती पोटी आपल्या काकांच्या नावाचा धावा सुरु केला. पण त्यांचे काकाच त्यांच्या मृत्यचे दूत होते हि अनेकांची मान्यता ! नारायण रावांची अखेर झाली, त्यांची प्राण ज्योत मावळली पण सोबत शनिवार वाड्याला लागली एका आत्म्याचा तळतळाट ...



१८२४ साली शनिवार वाडा जळला तो ह्याच करणीचा शाप असे म्हणतात ! पाच दारांचा शनिवार वाडा म्हणजे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा ,गणेश दरवाजा. आज अनेक पुणेकर अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री शनिवार वाड्याच्या जवळून जाण्याचे शक्यतो टाळतात  .. तुम्हाला आला आहे का अनुभव ?