दंगली मुळे होत्याचे नव्हते झालेल्या मातेची करून गाथा !
अत्यंत हालाखीच्या परिस्थिती मध्ये जीवन जगत असलेल्या गायकवाड ताईंची ची कहानी, ज्यांना गमवावे लागले आपले सर्व काही दंगलीच्या काही तासात निर्माण झालेल्या आगीने. आधीच गरिबीशी झुंज त्यात पतीचा अकाली मृत्यू, एक मुलगा आणि मुलगी ह्यांची खांद्यावर असलेली जवाबदारी ह्यातून त्यांनी अंडा भुर्जीची टपरी रेल्वेस्थानकावर उभी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला.

परंतु पैसे जवळ नसल्याने त्यांना हि टपरी ८ दिवस बंद ठेवावी लागली,घरमालका कडून १० हजार रुपये उसने आणून अखेर माल भरला, थोडे टपरीचे काम केले, तेलाचे डबे,अंडे, नवीन बॅटरी असे सर्व साहित्य भरून ३ तारखेपासून आपला व्यवसाय पुर्वव्रत सुरु करण्याचे त्यांचे नियोजन. परंतु काही मिनिटात होत्याचे नव्हते झाले,दंगल घडली आणि शोभा राजाराम गायकवाड ह्यांचे होत्याचे नव्हते झाले.
आतील अंडी रस्त्यावर पडून फुटली, चहाचे ग्लास, कपबशी यांचीही वाताहात झाली. उरलेला माल चोरीला गेला, गॅस सिंलेडर, नव्या बॅटरीचेही नुकसान झाले. दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. हा प्रकार पाहून त्यांना रडूच कोसळले. मुलगा गणेश व मुलगी अंजना यांचीही अवस्था अशीच.
ना कुठल्या जातीचे नुकसान होते ! नुकसान होते ते गरिबांचे ..
शेवट भीमा-कोरेगावच्या दंगलीचे परिणाम त्यांना देखील भोगावे लागले, ह्यात ह्या माऊलीची चूक काय हे देवाचं जाणे पण महाराष्ट्र ह्यातून एक धडा घेऊन हे सर्व लवकरात लवकर संपवेल हीच अपेक्षा आणि भविष्य हे जाती-जाती मध्ये द्वेष न ठेवता सद्सद्विवेक हाताळेल हि अपेक्षा