Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का दहशतवाद्याची पत्नी बनायला चालली आहे रामायणमधील सीता फेम अभिनेत्री !

दूरदर्शनवर प्रसारित होणारे रामायण आणि महाभारत आपल्या लहानपणी सर्वांच्या आवडीच्या मालिका होत्या . या अशा मालिका होत्या ज्यांनी संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळवली होती . आजसुद्धा कुठल्याच मालिकेला ह्या मालिकांइतकी लोकप्रियता नाही मिळाली आहे . रामायण ही त्या मालिकांपैकी होती जी लागल्यावर लोक आपली हातातली काम सोडून बघत होते . आज आपण बोलणार आहोत रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध मालिका रामायण यामधील सीतेचे पात्र रंगवणाऱ्या दीपिका चिखलीया यांच्याविषयी .....

दहशतवाद्याची पत्नी बनायला चालली आहे रामायणमधील सीता


 रामायणानंतर दीपिका चिखलीया ह्यांना  बॉलिवुड चित्रपटातून अनेक ऑफर मिळाली. तरीपण , रामायणानंतर दीपिकाने अधिक चित्रपटांत किंवा मालिकांमध्ये जास्त  काम केले नाही. घर का चिराग आणि राजेश खन्ना बरोबर दस करोड रुपये यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे . त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या . पण आता त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे .

दहशतवाद्याची पत्नी बनायला चालली आहे रामायणमधील सीता


एका इंग्रजी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार दीपिका चिखलीया आता मनोज गिरी यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे . या चित्रपटाचे नाव गालिब असे आहे . याआधी दीपिका चिखलीया यांनी जॉनी बक्शी यांच्या खुदाई या चित्रपटात काम केले होते . मिळालेल्या माहितीनुसार गालिब हा चित्रपट दहशतवादी अफजल गुरु यांचा मुलगा गालिब यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे . या चित्रपटात दीपिका चिखलीया गालिबच्या आईचे पात्र निभावणार आहे . या चित्रपटाचं शूटिंग इलाहाबाद आणि वाराणसी मध्ये करणार आहे .


दहशतवाद्याची पत्नी बनायला चालली आहे रामायणमधील सीता


दीपिकाच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट अफजलगुरूवर नाही आहे तर तो मायलेकावर आहे . चित्रपटात दाखवले आहे कि एक दहशतवादी मेल्यावर त्याच्या बायको आणि मुलांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो याचे चित्रण या चित्रपटात केले आहे . दीपिका हि तब्बल २० वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर होती . दीपिकाचे लग्न झाले आहे आणि त्यांना मुलंदेखील आहेत . आज २५ वर्ष उलटली तरी पण  अजूनसुद्दा मला लोक दीपिका म्हणून नाही तर सीता म्हणूनच ओळखतात .