Loading...

आज लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची पुण्यतिथी ! बघा त्यांचे काही खास फोटो ...

 किडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले आज ह्या दुःखद घटनेला १३ वर्ष पूर्ण झाले . त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी हळहळली. मराठी चित्रपट सृष्टीची कधीही न भरणारी हानी ह्यानिमित्ताने झाली.

लक्ष्मीकांत बेर्डे  नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ - डिसेंबर १६, इ.स. २००४  मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.


लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले.

 ashi hi banva banvi
सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.
laxmikant berde wife

 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वपरिचित आहे. अशोक सराफ ह्यांच्या सोबत त्यांची जोडी होती आणि नंतर जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्मीकांत बेर्डे नाही असे सहसा घडलेच नाही. सर्व चित्रपट अगदी सुपरहिट ! त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. झपाटलेला हा अजूनही सोशल मीडियावर तितकाच प्रसिद्ध आहे. सचिन ह्यांनी दिग्दर्शित केलेला अशी हि बनवा बनवी हा तर क्लासिक्स मध्ये गणला जातो.
आमच्या वेबसाईट तर्फे लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना नम्र अभिवादन !