Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

उन्हाळी लागणे म्हणजे काय ? जाणून घ्या उपाय ..

जर कोणाला वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी म्हणजे लघवीस अत्यंत जळजळ होते. अशा वेळी अनेकदा लघवी गढूळ दिसते. तर कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी देखील दिसते.

उन्हाळी म्हणजे गरमपणा. ह्या तक्रारीची अथवा त्रासाची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत होते. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यामुळे साध्या लघवीमुळेही अधिक जळजळ होते जी त्याक्षणी सहन होणे अवघड होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी अधिक कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे अंतर आवरणाचा अधिक दाह होतो. अशी लघवी अधिक गडद पिवळी किंवा कधी कधी लालसर देखील  दिसते.

उन्हाळी लागली असेल त्यावेळी ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागतात. नाहीतर एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.



उन्हाळीवर तात्काळ उपचार केल्यास तुम्हाला साधारण २-३ दिवसात लगेच फरक दिसू शकतो पण ह्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास हा त्रास वाढत जाऊन लघवीमार्गाच्या आतील भागास तीव्र जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो.
मात्र जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. पाण्याच्या मात्र सोबतच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया देण्यात याव्या. असल्यास फेनॅडिनच्या गोळया ज्याला फेनॅझोपायरिडिन देखील बोलले जाते. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.
उन्हाळीसाठी १०० मिली पाण्यात २५ ग्रॅम धने भिजवून दार १२-१२ तासांनी पाणी गाळून प्यावे जे अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदिक उपाय करायचा असल्यास चंद्रकलावती आणि चंद्रप्रभावती हे देखील अत्यंत गुणकारी ठरतात