Loading...

शेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला



शेअर मार्केटबद्दल आजपण  सामान्य माणसाला खूप कुतूहल आहे. सामान्य माणूस आजपण शेअर मार्केटला जुगारच समजतो .  पण भारतात अस एक अवलिया व्यक्तिमत्व आहे कि ज्याने शेअर मार्केटमध्ये मोठमोठी उड्डाणे घेतली आहेत .  त्यांकाही लोक त्यांना भारताचे वॉरेन बफेट अस हीम्हणतात .  अशा या उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्यामाणसाचे नाव आहे राकेश झुनझुनवाला. आज आपण त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया . 

शेअर मार्केटचा बादशाह राकेश झुनझुनवाला


त्यांनी १२०० रुपयापासून केली होती सुरुवात 

१९८५ मध्येत्यांनी फक्त १२०० रुपयापासून सुरुवात केली होती  तेव्हा त्यांनी टाटा टी या चहाच्या कंपनीचा शेअर विकत घेतला होता .  एक वर्षानंतर म्हणजे १९८६ मध्ये ५००० शेअर विकून त्यांनी ५ लाख रुपये नफा कमावला होता .  त्यानंतर त्यांनी मागे वळूनच पहिले नाही. आतापर्यंत शेअर मार्केटमधून त्यांनी 15600 कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की देशातील पहिल्या 100 श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे 53 वे स्थान आहे.

सगळ्यांच्या नजरा असता त्यांच्यावर 





राकेश झुनझुनवाला हे एक  शेअर गुंतवणूकदार आहेत.ह्यामध्ये  त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला हीसुद्धा त्यांना मदत करते. विशेष म्हणजे शेअरबाजारात पैसे गुंतवणाऱ्या लोकांच्या नजरा त्यांच्यावर असतात. त्यांनी जर एखादा शेअर घेतला तर बाकीचे सर्व त्याच कंपनीचा शेअर घेण्याचा प्रयत्न करतात . 

फक्त आईसाठी त्यांनी गमावले ७०० कोटी 

एकदा त्यांच्या आईने त्यांना म्हटले की, तू आपले सर्व पैसे शेअर मध्ये का गुंतवतोस कुठल्यातरी मालमत्तेत गुंतवणूक करून पहा की? त्यावेळी ते हसले आणि काही दिवसानंतर आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी राकेश यांनी मुंबईच्या उच्चभ्रू मलबार हिल्स परिसरात एक फ्लॅट खरेदी केला. 



2004 मध्ये या फ्लॅटची किंमत 27 कोटी होती. राकेश यांनी हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी Crisil चे 27 कोटी किंमतीचे शेअर विकले. 2015 मध्ये राकेश यांनी तो फ्लॅट 48 कोटींना विकला. म्हणजे त्यांना एकूण 21 कोटी रुपयांचा फायदा झाला. मात्र त्यावेळी Crisil चे शेअर विकले नसते तर आज त्यांची किंमत 700 कोटी असती आणि त्याच्या बरोबर अजून 50 कोटी डिविडेंड वेगळा मिळाला असता.


झुनझुनवाला यांनी गुंतवणूकदारांना दिलेली टिप्स 

१. कुठलीही गुंतवणूक करताना पहिले स्वतः वर विश्वास ठेवा . 

२. योग्य संधी साधा. त्यानंतर रिटर्नवर फोकस करा.

३.  कधीपण लक्षात ठेवा कि तुम्ही गुंतवणूक किती करता यापेक्षा रिटर्न किती येणार याकडे जास्त लक्ष द्या. 

४.  छोट्या शेअरकडे दुर्लक्ष करू नका.त्याच्यातून  पण तुम्ही चांगला नफा कमवू शकता . 

५.  जर बाजारपेठेत मंदीचे वातावरण असेल तर तुमच्या पोर्टफोलियोकडे लक्ष ठेवा.

६. शेअर लगेच कमी नफ्यासाठी विकण्याची घाई करु नका.

७.  दिवसातून किमान दोन वेळा तुमचा पोर्टफोलियो चेक करा.