लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १० लाख रुपये .. वाचा आणि दुसऱ्यांना सांगा
जसे जसे जग बदलत आहे तसे तसे पैसे कमवायचा अनेक नवनवीन संधी बाजारात उपलब्ध होते आहे. परंतु त्यात योग्य पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे असते. असाच एक योग्य पर्याय म्हणजे लावा पक्षी. जापानीज़ लावा हा एक कुक्कुट या संवर्गातील पक्षी आहे. ह्या पक्षाचे मास खाण्यास अत्यंत पौष्टिक असते तसेच त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह ह्या सारखी अनेक जीवनसत्व भरपूर असतात. कन्याकुमारी ह्या तामिळनाडु राज्यातील जिल्हयात मोठया प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिगं करतात.
२५० स्क्वेयर फुट जागेत १००० पक्षी राहु शकतात. लावा पालन करणे हे अत्यंत सोपे असते. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात, हा पूरक व्यवसाय तुम्ही करू शकतात. शेतीसाठी हा व्यवसाय उत्तम पूरक व्यवसाय ठरतो. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसिकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय शक्यतो पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबड़ीला लागणारे खाद्य या पक्षाला लागते. एक महिन्यात १५० ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी १२०-१३० रुपयाला तर ठोक मध्ये साधारण ५० रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात.
२०१३ पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती. ६ डिसेंबर २०१३ रोजी या “जापनीज़ क्वेल्स” म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फ़ार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपुर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत. भंडारा शहरापापासून वरठी रोडवर १० किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता.
आतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून १५ लाख रुपयांचा नफ़ा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्रराबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे
स्रोत : महाराष्ट्र सरकार कुक्कुट पालन मंडळ

अभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी
पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या
शेतात १५०० चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग
येथून एक दिवसाचे १००० लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी १२ हजार
रुपये खर्च आला. आणलेल्या १००० पिल्लांपैकी ५०० पिल्ले १५ दिवसातच दगावाले.
यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी ५०० पक्षाना वाचवले. एक महिन्यात हे
पक्षी १५० ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी
त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.