ह्या कारणामुळे धोनी राहतो आपल्या सख्ख्या भावापासून वेगळा !
भारतीय क्रिकेट टीमचा जबरदस्त फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी जवळपास सगळं माहिती आहे . २०१६ मध्ये एम एस धोनी या अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट देखील आला होता . या चित्रपटात माहीचे काही माहित नसलेल्या गोष्टी समोर आल्या . चित्रपटात धोनीच्या क्रिकेटर होण्याआधी त्याचे आयुष्य आणि त्याच्या परिवाराविषयी पहिले . परंतु खऱ्या आयुष्यात धोनीला एक भाऊ पण आहे . जे चित्रपटात दाखवले नाही आहे . कोण आहे हा धोनीचा भाऊ ? त्याच धोनीशी काय नातं आहे ? चला जाणून घेऊया
धोनीचं पाहिलं प्रेम
भले धोनीचं लग्न झालेलं असो तरीपण चित्रपटात त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी दाखवण्यात आलं आहे . हेदेखील दाखवण्यात आलं कि प्रेयसीच्या मृत्यूनंतर धोनी किती खचून गेले होते .
मोठ्या बहिणीची साथ
चित्रपटात हेदेखील दाखवलं आहे कि धोनीची मोठी बहीण जयंती हिने त्यांना कशाप्रकारे साथ दिली . पण त्यांच्या भावाविषयी कुठेच नमूद नाही करण्यात आले . ह्यावर माहीच्या भावाने म्हटले कि ही निर्मात्याची पसंत आहे ह्याविषयी मी काय बोलू शकतो .
महेंद्रचा मोठा भाऊ आहे नरेंद्र
नरेंद्र यांचा जन्म २२ऑक्टोबर १९७१ रोजी झाला होता . नरेंद्र हे महेंद्र पेक्षा १० वर्षांनी मोठे आहे . ते आता रांचीमध्ये राहतात .
ते राजकारणी आहेत
महेंद्रसिंहचे मोठे भाऊ नरेंद्रसिंह धोनी हे व्यवसायाने एक राजकारणी आहेत . ते मुलायमसिंह यांच्या सपा या पक्षासाठी काम करतात . सपा च्याआधी ते भाजप या पक्षासाठी काम करत होते .
धोनीचे भाऊ व वाहिनी
नरेंद्रसिंह धोनी यांचे २१ नोव्हेंबर २००७ मध्ये लग्न झाले होते . सध्या ते आपल्या पत्नीसोबत राहत आहेत .
सुरवातीच्या काही दिवस राहत होते एकत्र
सुरवातीचे काही दिवस सर्व एकत्र राहत होते . एकत्र हसत खेळत होते . धोनीने जेव्हा खेळायला सुरु केले तेव्हा नरेंद्र त्यांच्यासोबत नव्हते . तेव्हा ते घरापासून लांब गेले होते . पण सुट्टीच्या दिवसात ते धोनीची मॅच नक्की बघतात .
१९९१ ला झाले वेगळे
नरेंद्रसिंह धोनी हे १९९१ साली आपल्या परिवारापासून दूर गेले . त्यांना साधे सरळ जीवन जगायला आवडते . ते त्यांच्या पत्नी व मुलांसोबत रांचीमध्ये राहतात . धोनी आणि त्याच्या मोठ्या भावाचे संबंध हे चांगलेच आहे आणि मोठ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटून वेळ देतात परंतु दोघांचे जीवनाचे मार्ग वेगळे आहे !