भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट !
भीमा कोरेगाव या प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रांनी क्लीनचिट दिली आहे . आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते . मुख्यमंत्री म्हणाले कि , या प्रकरणी एका महिलेने तक्रार केली होती कि मी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवून आणताना पाहिलं . त्यानंतर तात्काळ ती तक्रार नोंदवून घेऊन त्यावर कारवाई सुरु केली . त्यानंतर झालेल्या तपासात आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आले आहेत . त्यापैकी एकही पुरावा हा या प्रकारात संभाजी भिडे यांचा हात आहे असे दर्शवत नाही . ज्या महिलेने तक्रार केली होती . ज्या महिलेचे मॅजिस्ट्रेटसमोर साक्ष नोंदवून घेतली होती त्या महिलेने असे सांगितले कि मी संभाजी भिडे यांना ओळखतदेखील नाही . मी त्यांना कधी आजपर्यंत पाहिलेदेखील नाही .
याव्यतिरिक्त इतर काही साक्षीदार पण होते होते . त्यांनी पण हीच साक्ष दिली आहे कि आम्ही पाहिलेलं नाही . याशिवाय पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या संघटनेतील सहकारी यांच्या गेल्या ६ महिन्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले . त्यात असे दिसून आले कि संभाजी भिडे यांचे गेल्या ६ महिन्यात येथे लोकेशन नाही . त्यांच्या सहकाऱ्यांचे पण नाही . गेल्या ६ महिन्यात त्या भागातील लोकांशी त्यांचा काही संपर्क पण नाही . त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्रींना काही नवे पुरावे दिले आहेत . काही अशा फेसबुक पोस्ट आहेत जे या प्रकरणात संभाजी भिडे यांचा कसा सहभाग आहे हे दर्शवतात . यावर मुख्यमंत्री म्हणाले कि या पुराव्यांचा अभ्यास करून ८ दिवसात यावर निर्णय दिला जाईल . मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले आहे कि या प्रकरणामागे कोणीही असो त्याला माफ केले जाणार नाही .