निघाले वाभाडे .. अमेरिकेच्या विमानतळावर केले पाकिस्तानी पंतप्रधानांचे कपडे काढून केली सेक्युरिटी चेक !

पाकच्या पंतप्रधानांची अमेरिकेतील जेएफ केनेडी या विमानतळावर चांगलीच बेअब्रू झाली आहे . त्याचे कारण असे होते कि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची चक्क संपूर्ण कपडे काढून तपासणी करण्यात आली . एखाद्या पंतप्रधानाला अशी वागणूक द्यायची जगातील ही जगातील पहिलीच वेळ असावी . ह्या घडलेल्या प्रकारामुळे पाकिस्तानी जनता आणि नेते यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे .
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांची बहीण ही अमेरिकेत राहते . पंतप्रधांना असे कळले कि त्यांची बहीण आजारी आहे . मग तेव्हा ते तिची विचारपूस करण्यासाठी अमेरिकेत आले होते . तिच्या तब्येतीविषयी विचारपूस करण्यासाठी ते खासगी दौऱ्यावर होते . पण जेव्हा ते जॉन एफ केनेडी या विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकाने अडवले . त्यानंतर त्यांना एका खासगी खोलीत नेण्यात आले . तेथे त्यांची संपूर्ण कपडे काढून तपासणी घेण्यात आली . त्यानंतर संपूर्ण तपासणी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले .
या घटनेनंतर त्यांनी तात्काळ हि माहिती पाकिस्तानी सरकारला दिली . त्यानंतर ही बातमी संपूर्ण पाकिस्तानात पसरली . पाकिस्तानात त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे . तेथील नेते आणि सामान्य जनता अमेरिकेवर आपला संताप व्यक्त करत आहेत . त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशातील राजकीय संबंध धोक्यात आले आहे . अमेरिका आता पाकिस्तानी लोकांना व्हिसा द्यावा का नाही यावर पुनर्विचार करते आहे . या घटनेमुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांमध्ये तणावाचे वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .