संभाजी भिडे हे सरकारचे जावई आहेत का ? - प्रकाश आंबेडकर
भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर ह्यांनी आज मुंबई मध्ये एका मोर्चाचे आयोजन केले आणि त्यात भीमा कोरेगाव मधील घटनांनंतर अजूनही दोषींवर काही कारवाई होत नाही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीला जावई ट्रीटमेंट का मिळत आहे ?
भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये एफआयआर मध्ये २ आरोपी आहे. १ आरोप अटक झाला दुसरा आरोपी अटक झाला नाही, तेव्हा दुसऱ्या आरोपीला तुम्ही अटक करत नाही त्यावेळेस तुम्ही त्याला जावया सारखे वागवता आहे का? तो तुमचा जावई आहे का हे पहिल्यांदा सान्गा ? आरोपी हा सरकारचा जावई होऊ शकतो हे विचारायला आम्ही आज मुंबई मध्ये मोर्चा घेऊन आलो आहे.
सरकार सांगत नाही म्हणून पोलीस हालत नाही आहे असे आम्ही पोलिसांशी बोलतो तेव्हा ते आम्हाला सांगतात.
"भिडेला अटक झालीच पाहिजे", "देश का नेता कैसा हो ... " इत्यादी घोषणा देत त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला होता ..