रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी? ह्याचे काही घरगुती सोपे उपाय ....
गाजराचा रस : सुमारे 250 ग्रम पिवळसर मद्रासी गाजरांचा रस काढून तो दुपारी जेवल्यानंतर प्यावा. त्यात भरपूर `अ’ जीवनसत्त्व असते.
आवळा : कोणत्याही स्वरुपातील आवळा शरीराला अतिशय उपयोगी असतो. आवळ्यांमध्ये कॅल्शियम, लोह, क्षार व `क’ जीवनसत्त्व असते. नुसता आवळा, मोरावळा, अवलेह, च्यवनप्राश, आवळकटी/आवळा सुपारी, आवळा चूर्ण, आवळा सरबत, आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मावा, तेल इ. प्रकारांतील आवळा निर्धोकपणे वापरता येतो. विशेषतः आवळा चूर्णावर गाईचे दूध प्यायले तर चयापचय सुधारते व आयुष्यमान वाढते.
मूग : कोणत्याही स्वरुपातील मूग हे उत्तम कडधान्य आहे. मोड आलेले मूग चावून चावून नाश्त्याचे वेळी खावेत किंवा त्यांची शिजवून उसळ करून खावी किंवा उसळ बनवण्यापूर्वी पाणी बाहेर काढून प्यावे. मुगाची सालासह डाळ वापरून खिचडी बनवून खावी. मुगदळाच्या वडय़ा-मुगाचे पीठ तुपावर परतून गुळाच्या पाकात टाकून वडय़ा बनवाव्यात.

रक्तवृद्धी : ज्या प्रमाणात रक्त जास्त असेल त्या प्रमाणात माणसाची रोगप्रतिकारशक्ती असते. म्हणून प्रतिकारशक्ती कायम टिकविण्यासाठी रक्त वाढवणार्या पुढील वस्तू खाण्यात याव्यात.
खजूर- रोज किमान दोन आठय़ा चावून चावून खाव्यात. वर पाणी प्यावे.
गूळ- गुळाचा सुपारीएवढा खडा पाण्याबरोबर खावा.
कुळीथ/हुलगे- या कोकणातील कडधान्याचा वापर करून पिठले किंवा उसळ बनवतात.
ज्येष्ठमध : त्रिदोषनाशक असल्याने रोज रात्री झोपताना 1 चमचा ज्येष्ठमध पूड अर्धा कप गरम पाण्यातून सकाळ संध्याकाळी घेणे.
वरील उपाय एक महिना जरी केले तरी तुम्हाला फरक दिसून येईल !