कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा ? आता तरी फसू नका ...
बरेच जण विचारतात कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखायचा, म्हणून हे फोटो दाखवत आहे. कोकणचा हापुस गडद केसरी रंगाचा असतो तर कर्नाटकचा आंबा हा पिवळ्या रंगाचा असतो. चवीत प्रचंड फरक आहे. कोकणचा हापुस अत्यंत गोड आणि कर्नाटक कमी गोड व तुरकट चवीचा असतो. कोकणच्या हापुसची साल पातळ असते व कर्नाटक हापुसची साल जाड असते. अनेक जण देवगड रत्नागिरी नावाखाली कर्नाटक हापुस विकतात यामुळे महाराष्ट्रातील कोकणच्या हापुसला भाव मिळत नाही व ग्राहकांची ही फसवणुक होते, याकरिता हा फरक दाखविला आहे. आपण आंबा खरेदी करताना असे पडताळून पहा आणि होणारी फसवणूक टाळा..
पण अपेक्षा आहे कि आम्ही सांगितलेल्या ह्या क्लुप्त्या तुमची फसवणूक टाळू शकतील कारण शेवट आपण पैसे मोजतो नाही का ?