Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

गर्भवती असताना पोटावर भार देऊन झोपणे सुरक्षित आहे का ?



गर्भावस्थेच्या काळात एक स्त्री ही अगदी कपडे कुठले घालावे , आहार कुठला घ्यावा यापासून ते रात्रभर झोप न येण्यापर्यंत यासारख्या गोष्टींमधून गर्भवती असताना जावे लागते . गर्भावस्था हि प्रत्येक स्त्रीचे आयुष्य बदलणारा एक अनुभव असतो . उदाहरणार्थ झोपताना एका विशिष्ट बाजूनेच झोपावे . इतके वर्ष तुम्ही कसेही झोपले असतील पण तुमच्या पोटात गर्भ वाढत असताना तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात .  . सर्वात पहिले म्हणजे तुम्ही आराम करा . गर्भावस्था ही काही महिन्यापुरतीच असते . त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे . गर्भावस्थेत असताना झोपताना  काय काळजी घ्यायची ते जाणून घ्या.

गर्भावस्थेत पोटावर झोपणे सुरक्षित आहे.  त्याविषयी काही टिप्स देत आहोत .

१. गर्भावस्थेत असताना जर तुम्हाला अजून पलंगावर किंवा जमिनीवर  पण नीट झोपता येत नसेल तर आमच्या काही कल्पना आहेत त्यांचा तुम्ही वापर करून बघावा .

२. स्वतःला आरामदायी वाटण्यासाठी अतिरिक्त उशीचा वापर करावा .  जिकडे तुम्हाला आरामदायी वाटत असेल त्या ठिकाणी ती अतिरिक्त उशी ठेवावी .

३. झोपण्याआधी स्वतःला एकदम शांत करण्याचा प्रयत्न करा . त्यानंतर स्वतःला झोपण्यासाठी तयार करून झाल्यावर झोपल्याने शांत झोप लागेल .

४. जर खरोखर झोपणे अवघड जात असेल तर थोड्या वेळ मंद आवाजात शांत संगीत ऎका . अशाने नक्की चांगली झोप लागेल .

५. झोपण्याआधी आंघोळ करणे ही पण चांगली कल्पना आहे . त्यामुळे शांत झोप लागते .

६. आपल्याला आराम मिळण्यासाठी आपल्या जोडीदारास मालिश करायला सांगावे . पण कोणत्याही विशिष्ट भागावर भर न देण्यास सांगावे . एक मुलायम मालिशने पण काम होऊन जाईल .

७. रोज रात्री झोपण्याची दिनचर्या तशीच ठेवावी . त्यात काही बदल करू नये . अशाने चांगली आणि शांत झोप लागेल .



तुमची जर ही गर्भधारणेची पहिलीच वेळ असेल तर तुम्ही आपली झोपण्याची सवय आतापासूनच बदलून टाका . म्हणजे तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या गर्भधारणेच्या वेळी अडचण येणार नाही .