तुमचे आवडते ८ बॉलिवूड स्टार आहेत शाकाहारी, जाणून घ्या कोण कोण आहेत यात समाविष्ट !
बॉलिवूड स्टार असो किंवा सामान्य माणूस प्रत्येकाची आपली खाण्याविषयी वेगळी आवड असते . भारतीय लोकांना तर चटपटीत खायला खूप आवडत . कोणाला शाकाहारी तर कोणाला मांसाहारी आवडत . आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा कलाकारांविषयी सांगणार आहोत जे काळानुसार शाकाहारी होत गेले . तुमचे आवडते कलाकार सांगत आहेत कि त्यांनी मांसाहार का बंद केले . चला मग जाणून घेऊया .
१. विद्या बालन
विद्याचा जन्म तामिळ ब्राम्हण परिवारात झाला आहे . शाकाहारी भोजन केल्याने त्वचा चांगली राहते . त्यामुळे विद्या शाकाहारी भोजन करणे जास्त पसंत करते .
२. विद्युत जमावाला
विद्युत लहानपणापासूनच शाकाहारी नव्हता . वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत भरपूर चिकन मटण खाल्ले आहे . पण त्यानंतर सर्व सोडून तो शुद्ध शाकाहारी बनला . विद्युतच असं म्हणणं आहे कि शाकाहारी खाल्ल्याने तब्येत चांगली राहते .
३. अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माला आपल्या कुत्र्यावर इतके प्रेम आहे कि तिने मांसाहारी खाणे सोडून दिले . कारण तिच्या कुत्र्याला मीटचा दुर्गंध आवडत नाही . बस एवढ्याशा कारणामुळे ती शाकाहारी बनली .
४. शाहिद कपूर
शाहिद कपूरचे म्हणणे आहे कि शाकाहारी राहिल्याने शरीर जास्त दिवस सुदृढ राहते . याच कारणामुळे शाहिद शाकाहारी आहे .
५. नेहा धुपिया
नेहाचा प्राण्यांच्या संरक्षणावर विश्वास आहे . याच कारणामुळे नेहा धुपिया ही शाकाहारी आहे .
६. अमिताभ बच्चन
अमितजी आज पण एवढ्या ताकदीने काम करत आहेत . त्यामुळे एकच प्रश्न मनात येतो कि यांच्या फिटनेसचा काय गुपित आहे . एकच गुपित आहे कि अमिताभ बच्चन शुद्ध शाकाहारी आहेत .
७. मल्लिका शेरावत
२०११ पासून मल्लिकाने मांसाहारी खाणे सोडून दिले . तिचे म्हणणे आहे कि शाकाहारी राहिल्याने माणूस जास्त फिट राहू शकतो .
८. आलिया भट्ट
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात कमी वयात प्रसिद्ध झालेली कलाकार आहे . आलियाने सांगितले कि तिने फिट राहण्यासाठी मांसाहार बंद केले .