लग्नाशिवाय जोडपे राहू शकतात कोणत्याही हॉटेल मध्ये सोबत, जाणून घ्या कायदेशीर अधिकार ..
अनमॅरिड कपलला बरेच अधिकार दिले गेले आहेत . पण बऱ्याच लोकांना त्याची माहितीच नसते . त्यामुळे त्यांना बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावे लागते . जसे कि एका हॉटेलच्या एका खोलीत अनमॅरिड कपल सोबत राहू शकतात . हा काही गुन्हा नाही आहे . चला मग बघूया कुठले आहेत हे अधिकार .
अनमॅरिड कपलचे बरेच असतात अधिकार
अविवाहित जोडप्यांना पण काही अधिकार दिले गेले आहेत . ज्यांच्याबाबतीत बऱ्याच लोकांना माहीतच नाही . खरंतर लाज वाटत असल्याने लोक यांच्याविषयी जाणून घेत नाही . पण शहरी भागातील परिस्थिती बदलत आहे . लोक आता जागरूक व्हायला लागले आहेत . आपल्या हक्कासाठी आवाज उठवत आहे .
हॉटेलच्या खोलीत थांबू शकतात
अविवाहित महिला आणि पुरुष हॉटेलच्या एका खोलीत आरामशीर थांबू शकतात . होटल एसोसिएशन ऑफ इंडिया यांच्यानुसार असा कुठलाच कायदा नाही कि ज्यात बलिक मुलगा आणि मुलाला हॉटेलची रूम घेण्यापासून थांबवू शकेल . नियमानुसार दोघे बलिक असायला हवे आणि दोघांकडे ओळखपत्र असायला हवे .
पोलीस नाही करू शकत अटक
फक्त अविवाहित असल्याकारणाने कुठल्याही जोडप्याला हॉटेलच्या रूमधून पोलीस अटक नाही करू शकत . जर ते दोघे त्यांच्या मर्जीने थांबले असतील आणि त्यांच्याविरुद्ध कोणती तक्रार नसेल तर त्यांना अटक नाही केली जाऊ शकत .
बराच काळ सोबत राहिलेत तर विवाहित
जर कुठले जोडपे पती पत्नीसारखे सोबत राहत असतील तर त्यांना कायद्याने विवाहित मानले जाईल . शहरात लिव्ह इन रिलेशनशिपचे कल्चर वाढत चालले आहे . त्यामुळे कोर्टाने असा आदेश दिला आहे कि कोणतेही अविवाहित जोडपे बराच सोबत राहिल्यास त्यांना पण विवाहित मानले जाईल .
महिला संपत्तीची वारस
जर कुटले जोडपे बराच काळापासून सोबत राहत असतील तर जरी कायद्याने त्यांचे लग्न झाले नसेल आणि जर या काळात मुलाची मृत्यू झाली तर मुलगी त्याच्या संपत्तीवर आपला हक्क दाखवू शकते . ती कायद्याने त्या संपत्तीची मालक होऊ शकते .
सार्वजनिक जागांवर केल्यास गुन्हा
दोन समवयस्क आपल्या इच्छेने शारीरिक संबंध बनवू शकतात पण त्यांना ते सार्वजनिक जागेवर नाही करता येणार . असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते . अश्लीलता पसरवण्याच्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो . तुरुंवास पण भोगावा लागू शकतो .