Loading...

जेव्हा नाना वाजवतो तबला आणि धरतो गायकासंगे ताल !

Nana Patekar Paying Tabla


आज नाना पाटेकर ह्यांना कोण नाही ओळखत . बॉलिवूडमधील सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात . इतके वर्ष त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले अधिराज्य गाजवले आहे. आता ते मराठी चित्रपटसृष्टीत आपले प्रदर्शित होत पाय रोवत आहेत . येत्या ९ फेब्रुवारीला त्यांचा नवीन मराठी चित्रपट आपलं माणूस प्रदर्शित होत आहे . त्यानिमित्ताने नाना पाटेकर यांच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकूया .

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.

Nana Patekar Paying Tabla


नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.

राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.

नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.

१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.

Nana Patekar Paying Tabla


१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.

२०१४ मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.

सध्या नाना पाटेकर हे त्यांच्या येणाऱ्या आपला माणूस या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत . अलीकडेच नाना पाटेकर हे एका कार्यक्रमात गेले असताना त्यांना तबला वाजवायचा मोह झाला . तेव्हा त्यांनी तेथे उत्तम तबलावादन केले . बघा खालील विडिओ मध्ये नाना पाटेकर यांना तबला वाजवताना .