भारताच्या या मंदिरांमध्ये मिळतो आगळा वेगळा प्रसाद,चला भेट देऊ या !
भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे . संपूर्ण भारतात विविध धर्म, संस्कृतीचे लोक मिळून मिसळून राहतात . आस्थेचे केंद्र असलेला भारत देशात अनेक मंदिर आहेत . पण भारतात असे काही काही मंदिर आहेत जे आपल्या प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत . तुम्ही आतापर्यंत मंदिरांमध्ये लाडू, पेढे , बत्ताशे अशा प्रकारचा प्रसाद खाल्ला असेल . बघा या मंदिरांचे आगळेवेगळे प्रसाद .
बर्गर आणि सॅण्डविचचा अनोखा प्रसाद
हे आहे चेन्नईच्या पडदापाई मध्ये दुर्गा मातेचे मंदिर आहे . येथे प्रसादाच्या रूपात लोकांना ब्राउनी, बर्गर, सैंडविच आणि सलाड दिले जाते . मंदिराचा हा प्रसाद फूड स्टँडर्डच्या अनुसार आहे . या प्रसादावर एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते . मंदिरातील मशीनमध्ये टोकन टाकून भक्त प्रसादाचा डबा घेतात .
या मंदिरात चढवले जाते चॉकलेट
केरळमधील बालसुब्रमणिय या मंदिरात देवाला चॉकलेट चंदावले जाते आणि भक्तांना पण प्रसाद म्हणून चॉकलेट वाटले जातात . तेथील स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार बालमुरूगन देवाला चॉकलेट खूप आवडतात . म्हणून प्रसादच्या रूपात येथे चॉकलेट चढवायची परंपरा आहे .
या मंदिरात मिळतो नूडल्सचा प्रसाद
कोलकात्याच्या टांगरा या क्षेत्रामध्ये कालीमातेचे मंदिर आहे . हे मंदिर चायनीज काली मातेचे मंदिर म्हणून पण ओळखले जाते . या मंदिरामध्ये भक्त नूडल्स, गहू आणि भाज्यांचा भोग लावतात . त्याचे कारण असे आहे कि कोलकात्याच्या या भागात चायनीज लोकांचे प्रमाण जास्त आहे . त्याच भागात हे मंदिर असल्याने हि प्रथा सुरु करण्यात आली .
येथे मिळतो डोश्याचा प्रसाद
तामिळनाडूतील मदुराई मध्ये बनलेले श्री विष्णू यांचे अलागार मंदिर आहे . येथे देवाला प्रसादाच्या रूपात डोसा चढवला जातो . या प्रसादाला मंदिरातच तयार केले जाते . तेच लोकांना प्रसादाच्या रूपात डोसे वाटले जातात .