Loading...

नर्गिस बनून पुनरागमन करणार बॉलिवूडमध्ये मनीषा कोईराला !



मनीषा कोईरालाच नाव ऐकताच आपल्या मनात चित्र उभे राहते ते म्हणजे प्रेमळ आणि निष्पाप मुलीचे . सौंदर्याच्या बाबतीत पण मनीषाला तोड नाही आहे . ती आज पण तितकीच सुंदर दिसते जितकी १० वर्षांपूर्वी दिसायची . काही दिवसांपूर्वी मनीषाच्या चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यातील तिच्या अभिनयाने तिने लोकांची मने जिंकून घेतली होती . हा चित्रपट जास्त चालला नाही पण मनीषाच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते . मनीषा कोईरालाची गणती भारताच्या टॉप अभिनेत्रींनमध्ये केली जाते . पण काही काळाकरता मनीषा मोठ्या पडद्यावरून गायब झाली होती . तिला कॅन्सर झाल्यामुळे ती बराच काळ बॉलिवूडपासून लांब निघून गेली होती . पण आता पुन्हा एकदा मनीषा कोईराला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे . लवकरच ती रणबीर कपूरसोबत चित्रपटात दिसणार आहे .



साल २०१२ हा मनीषा कोईरालासाठी खूप वाईट ठरला होता . याचवर्षी तिला कळले होते कि तिला ओव्हेरियन कॅन्सर आहे . या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप मोठा झटका दिला होता . पण आनंदाची गोष्ट ही आहे कि एवढ्या मोठ्या आजाराला मात देऊन ती आता पूर्णपणे बारी झाली आहे . आता ती एकदम बरी आहे आणि सामान्य आयुष्य जगते आहे .



तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त त्याच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे . यात संजय दत्तचे पात्र रणबीर कपूर निभावणार आहे आणि त्याची आई म्हणजे नर्गिसचे पात्र मनीषा कोईराला निभावणार आहे . या पात्रासाठी मनिषापेक्षा दुसरी कुठलीच अभिनेत्री शोभली नसती . मनीषाचे सौंदर्य हे नर्गिस दत्त च्या सौंदर्यापेक्षा कमी नाही आहे . नर्गिसच्या  या पात्रासाठी मनीषा आपला सगळा जीव ओतायला तयार झाली आहे.



४७ वर्षाच्या या अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी केप टाऊनमध्ये चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी यांच्यासोबत बघितले गेले होते . त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पण शेयर केला होता . असं सांगितलं जात आहे कि संजय दत्तवर आधारित हा चित्रपट ३० ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित होऊ शकतो .