Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नक्की वाचा - लग्नाच्या दिवशी मुलीच्या बापाने केलेले भावुक भाषण !


" माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे . पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे . माझ्यावर विश्वास ठेवा , त्याबद्दल माझी कुठलीही त़र्कार नाही . उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे . आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल . आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे . पण आमची एक विनंती आहे . तिला आनंदात ठेवा !


" मला खात्री आहे की , तुम्ही तिला आनंदात ठेवाल . कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील . पण प्रत्येक वडिला प्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावी असे वाटते . त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की , तिला आनंदात ठेवा . 

" ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती . उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे . मी तिचे लग्न करुन देत आहे ; कारण ते सगळे निसर्गनियमानुसार करावेच लागते . आपल्या संस्कृती समोर मी असहाय्य आहे आणि म्हणूनच तुमच्या घरी पाठवत आहे . ती माझ्या घरातील आनंद होती आणि आता तुमच्या घरी प्रकाश देईल , हा माझा तुम्हांला शब्द आहे . रक्त , घाम गाळून मी तिचे पालनपोषन केलेले आहे आणि आता ती परिपूर्ण बनली आहे . आता माझी मुलगी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल , सगळ्यावर प्रँम करेल , मायेची ऊब देईल . त्या बदल्यात माझे एकच मागणे आहे - प्लीज तिला आनंदी ठेवा !

" समजा , तुम्हाला कधी वाटले की , माझी मुलगी काही चुकीचे बोलली किंवा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला रागवायला माझी काहीच हरकत नाही. पण तिच्याशी प्रँमाने वागा . कारण ती खूप नाजूक आहे.