ज्याच्या नावाने गोलन्दाजाचे पाय थरथर कापायचे त्याच जयसूर्याची परिस्थिती झाली आहे अशी !
एक वेळ होती तेव्हा श्रीलंकेचा फलंदाज सनाथ जयसूर्या यांची गणती जगातील वेगवान फलंदाजांमध्ये केली जाते . जयसूर्यासमोर चांगले चांगले गोलंदाज गारद होऊन जायचे . जयसूर्या इतके खतरनाक फलंदाज होते कि जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर टिकाव धरू शकत नव्हता . पण आज त्यांच्याविषयी अशी धक्कादायक बातमी आली आहे कि सर्वांना आश्चर्य वाटेल . जगातील वेगवान गोलंदाजांना पळवणारा जयसूर्या ला आज चक्क कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे . जयसूर्या इतके लाचार झाले आहेत कि कुबड्यांशिवाय ते एक पाऊल पण पुढे नाही सरकवु शकत .
एकेकाळी श्रीलंकेचे तुफान फलंदाज जयसूर्या ४०० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणारे जगातील पहिले फलंदाज आहेत . जयसूर्याची गणती जगातील वेगवान फलंदाजांमध्ये केली जाते . जयसूर्याने २६ डिसेंबर १९८९ मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपला एकदिवसीय करियर सुरु केलं . त्यांनतर आपल्या तुफान फलंदाजीमुळे जगभरात प्रसिद्ध झाले .
श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सनाथ जयसूर्या आता चालण्यास पूर्णपणे असमर्थ आहे . तो आता कुबड्यांच्या आधाराविना एक पाऊल पण नाही चालू शकत . मिळालेल्या बातमीनुसार जयसूर्याला गुडघ्याचा आजार झाला आहे ज्याचं लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे . क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर जयसूर्याची श्रीलंकेच्या क्रिकेट समितीच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी दोनदा निवड केली गेली . या दरम्यान तो अनेक वादांमध्ये अडकला . अध्यक्ष असताना त्याने श्रीलंकेच्या टीममध्ये बरेच बदल केले . त्यामुळे खेळाडूंना आपली जागा नक्की नसल्याची भीती वाटायला लागली .
श्रीलंकन क्रिकेट टीमच्या निवड समितीवर अध्यक्ष असल्याच्या दरम्यान खेळाडूंच्या खेळावर परिणाम व्हायला लागला . त्यामुळे श्रीलंकेचा संघ आज कठीण काळातून जात आहे . त्यामुळे २०१७ ला श्रीलंकेच्या क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला . त्यामुळे जयसूर्याने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला . अशी बातमी आली आली आहे कि जयसूर्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे . जयसूर्याचे वय आता ४८ वर्षे आहे .