Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

म्हातारचळ : इम्रान खानने केले गुपचूप ३ रे लग्न ते पण धार्मिक गरज म्हणून ...

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान हा आपल्या गुपचूप केलेल्या तिसऱ्या लग्नामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे . प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि  तेहरीक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख राजकारणी-राजकीय नेते इम्रान खान यांनी पुन्हा लग्न केले आहे. १जानेवारीला लाहोर येथे त्यांचे लग्न पार पडले . असे सांगण्यात आले आहे कि अध्यात्माकडे कल असणाऱ्या या महिलेसोबत इमरान खान हे बरेच पूर्वीपासून संपर्कात होते . अध्यात्मिक प्रगती होण्यास मदत व्हावी म्हणून इम्रानने हे ३रे लग्न केले असे म्हंटले जात आहे ..



पाकिस्तान प्रसारमाध्यमांच्या दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारीला लग्न केल्यानंतर ते इस्लामाबादला पोहोचले जेथे त्यांच्या केसची सुनावणी होती . या केसमध्ये इम्रान खान यांना जामीन मिळाला आहे . इम्रान खान यांच्या पार्टीशी जोडलेले राजनैतिक आणि सचिव आन चौधरी यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले कि या बातमीत काहीच तथ्य नाही आहे . प्रसारमाध्यमांद्वारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे .



इमरान खान यांचा पहिला विवाह मूळची ब्रिटिश असलेली जेमिमा यांच्यासोबत झाले होते . जेमिमासोबत ९ वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या सहमतीने २००४ मध्ये घटस्फोट घेऊन टाकला . इमरान खानने टीव्ही प्रदर्शक रेहमान खानसोबत दुसऱ्यांदा लग्न केले, परंतुहेही लग्न फक्त १० महिनेच टिकू शकले . पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार,इमरान खानच्या वधूच्या जवळील नातेवाईकाच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला . वर्ष 2017 भारतीय क्रिकेटपटूंचे लग्न वर्ष ठरले  आहे कर्णधार  विराट कोहलीशिवाय यावर्षी भुवनेश्वर कुमार, कुणाल पंड्या, झहीर खान यांचा विवाह झाला आहे.