Loading...

जाणून घ्या का येतो बोटे मोडल्यावर आवाज आणि काय आहेत असे करण्याचे घटक परिणाम !


अनेकांना असते बोट मोडायची सवय 

बऱ्याच लोकांना आपली बोटे मोडायची सवय असते . काही हाताची बोटे मोडतात तर काही पायांची पण बोटे मोडतात . बरेचशे लोक जेव्हा रिकामे बसलेले असतात तेव्हा त्यांना कंटाळा येत असतो तेव्हा काहीतरी बसल्या बसल्या करायचे म्हणून ते हाताची बोटे मोडतात . काही लोकांचे असे म्हणणे आहे कि बोटे मोडल्याने हाताची हाडे मोकळी होतात . पण ही सवय आपल्या फायद्याची आहे का तोट्याची आहे ?

बोट मोडणे हे सामान्य गोष्ट आहे 

तुम्ही दिवसातून कितीतरी वेळा हाताची बोटे मोडत असाल. आता ही तुमची सवय झाली असेल . त्यामुळे तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष पण देत नसतील . आपण जेव्हा बोट मोडतो तेव्हा त्याचा आवाज का येतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?

बोटे मोडताना कशामुळे  येतो आवाज 

शास्त्रज्ञ यांच्या अनुसार आपल्या बोटांच्या हाडांमध्ये एक विशेष द्रव असतो . आपण त्याला श्र्लेष असे संबोधतो . हा द्रव हाडांना खडबडीत नाही होऊ देत आणि आपल्या हाडांचे घर्षण पण नाही होऊ देत . एक प्रकारे हे आपल्या हाडांचे ग्रीसचं आहे . लिक्विड स्वरूपात असलेला हा द्रव हाडांमध्ये बुडबुडे तयार करतो .



बोट मोडल्यावर का येतो आवाज 

जेव्हा आपण आपली बोट पाडतो तेव्हा हे बुडबुडे फुटायला लागतात . त्यामुळे टकटक असा आवाज येतो . तेव्हा ते बुडबुडे फुटत असतात . एकदा का ते बुडबुडे फुटले कि नंतर लगेच जर बोट मोडली तर आवाज नाही येत . त्याचे कारण हे आहे कि नवीन बुडबुडे बनायला कमीतकमी अर्धा तास तरी लागतो . त्यामुळे एकदा बोट मोडली तर लगेच परत मोडल्याने आवाज नाही येत .

हाडांसाठी महत्वाचे आहे हे द्रव 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा द्रव आपल्या शरीरातील हाडांसाठी खूप गरजेचा आहे . जर हा द्रव संपला तर आपल्या हाडांमध्ये घर्षण सुरू होईल आणि त्यामुळे आपल्याला हाडांचा त्रास सुरु होईल . त्यामुळे शक्यतो ही सवय सोडून द्या . ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे .

परंतु एका दुसऱ्या शास्त्रज्ञ व्यक्तीने केलेल्या संशोधना नुसार हे तुम्हाला फायदेशीरच आहे .. बघा व्हिडीओ 
>