अमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च !
अमेरिकेतील डेलावेर येथील 50 वर्षांच्या चर्चला स्वामीनारायण हिंदू मंदिरमध्ये रूपांतरित करण्यात आले . गेल्या महिन्यात तेथे प्राण अर्पण सोहळा पण आयोजित करण्यात आला होता .
टाइम्स ऑफ इंडिया लेखानुसार, अमेरिकेत हे तिसरे चर्च असेल आहे आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे चर्च आहे जे अहमदाबाद स्वामीनारायण संस्थेमार्फत एका मंदिरात रूपांतरित करण्यात आले . डेलावेअर प्रॉपर्टीच्या आधी संस्थानाने कॅलिफोर्निया आणि केंटकी येथील चर्चही मंदिरांमध्ये रूपांतरित करून घेतले होते . याव्यतिरिक्त लंडनमधील दोन चर्च आणि इंग्लंडमधील मँचेस्टरजवळील बोल्टन यांना संस्थेने मंदिरांमध्ये रूपांतरित केले आहे.हार्वॅँड मेनोनाइट चर्च 2014-2015 मध्ये संस्थेने विकत घेतले होते . याच्या नूतनीकरणास जवळपास तीन वर्ष लागले . अशी माहिती वसू पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे . टेल यांनी सांगितले की, नूतनीकरणादरम्यान दोन शिखर आणि एक घुमट भारतातून बनवून तेथे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नेण्यात आला . या प्रकल्पाच्या खर्चाविषयी विचारल्यानंतर पटेल यांनी सांगितले कि 3,000 चौरस फुटाच्याहेण्यासाठी मालमत्तेची मालकी हक्क घेण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी एकूण १. ४५ दशलक्ष डॉलर इतका खर्च आला होता . मिळालेल्या अहवालानुसार ते चर्च दैनंदिन वापरात नसल्या कारणाने विकत घेण्यात आले होते .
या संस्थेच्या मंदिराचे महंत भागवत प्रियदास यांनी सांगितले कि या मंदिरात भगवान गर्भगृह, अबजी बापाश्री, मुक्तिजीवन स्वामिभापा, भगवान हनुमान आणि भगवान गणपती यांच्या मूर्तींचा समावेश आहे. ते पुढे म्हणाले कि , "हे मंदिर सर्वसमावेशक आहे आणि हे पूर्णपणे पवित्र आहे. हे मंदिर फक्त धार्मिक कारणांसाठी नाही वापरले जाणार तर सांस्कृतिक,हस्तकला, नाटक या कार्यक्रमांसाठी पण वापरले जाणार आहे . 1971 साली जेव्हा गुरुदेव मुखजीवन स्वामीबापा अमेरिकेला आले तेव्हा फक्त काही गुजराती तेथे राहत होते . परंतु त्यांनी त्यांना भारतीय संस्कृती परराष्ट्र भूमीत जिवंत ठेवण्यास प्रोत्साहन दिले. अमेरिकेत वाढत्या हिंदूंच्या मंदिरांमुळे तेथील हिंदू आनंदित आहेत .