Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

यवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह…


सध्या आपण रोज नवे नवे काही ऐकत असतो त्यातच एक अशी धक्कादायक बातमी कानावर धडकली आहे कि यवतमाळ येथे नुकताच पार पडलेला एक विवाह सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. खरे तर विवाह घडणे हि सामान्य गोष्ट आहे पण हा एक वेगळाच विवाह आहे.  परदेशात होणारे समलैंगिक विवाह आपणास माहिती आहेत, पण यवतमाळ येथे असा हा महाराष्ट्रातील पहिलाच समलैंगिक विवाह संपन्न झाला आहे. माहितीनुसार यवतमाळ शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा आपापल्या इंडोनेशिया येथील एका मित्राशी विवाहबद्ध झाला आहे. हा विवाहसोहळा  यवतमाळमधील एका नामांकित हॉटेलमध्ये हा पार पडला.



30 डिसेंबरच्या रात्री यवतमाळ येथील स्टेट बँक चौकातील हॉटेलच्या परिसरात हा विवाह थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे देश विदेशातील निवडक ६०-७० वऱ्हाडी मंडळींसाठी मेजवानी सुद्धा देण्यात आली. या लग्नातील वधु आणि वर हे दोघेही पुरुषच आहेत. यवतमाळ येथील ऋषी नामक हा तरुण गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्निया(अमेरिका) मध्ये एका नामांकित कंपनीत महत्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याला तेथील ग्रीन कार्डही मिळालेले आहेत आणि तो तिथलाच रहिवासी आहे. तेथे मुक्कामी असतांना ऋषीला चीनमधील एका व्हीन नामक तरुणावर प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईवडिल यवतमाळ येथे राहत असल्याने लग्नही यवतमाळ येथेच करण्याचे ठरवले.


तसे तर ह्या सोहळ्याचे सर्वच आयोजन गुपित ठेवण्यात आले होते पण व्हाट्सएपवर या जोडप्याचा फोटो वायरल झाल्याने शहरात ही बातमी पसरली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात या लग्नाची चर्चा सुरू झाली. लग्नाविषयी कळल्यानंतर यवतमाळकरांनी तर तोंडात बोटे घातली होती. हे नवविवाहित जोडपे मात्र आपल्या हनिमूनला निघून गेले आहे.

घरून विरोध असून पण हे लग्न निर्विघ्न पार पडले, नवीन जोडप्यास शुभेच्छा !