हार्दिक पंड्याने केला बाबासाहेबांचा अपमान म्हणतो "कोण आंबेडकर, ज्यांनी ... " वाचा पूर्ण
भारताचा उभारता क्रिकेट खेळाडू आणि स्टार हार्दिक पंड्या ह्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर ट्विटर ह्या वेबसाईट वर डिसेंबर महिन्यात केलेली टीका चांगलीच भोवणार आहे असे चिन्ह दिसत आहे. जोधपूरच्या एका अनुसूचित जाती-जमातीच्या न्यायालयानं हार्दिक पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पांड्याविरोधात एक वकिलाने याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पांड्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ह्या प्रकरणावर हार्दिक पंड्या कडून कोणतीही अधिकारीक प्रतिक्रिया अजून आलेली नाही अथवा त्याला ह्याबद्दल अजून माहिती असेल अशी माहिती देखील नाही पण लवकरच हे प्रकरण मीडिया उचलून धरेल ह्यात शंका नाही. मोहम्मद शमीच्या बायकोच्या प्रकरणानंतर दुसरा क्रिकेटर वादात सापडल्याने आता क्रिकेट खेळायचे सोडून हि मंडळी असले उद्योगचं करतात काय असा प्रश्न पडू लागला आहे .
हार्दिक पांड्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोण आंबेडकर ?, ज्यांनी देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि देशाला आरक्षण नावाचा आजार दिला. पांड्याच्या याच विधानावर आक्षेप घेत मेघवाल यांनी याचिका दाखल केली आहे.
मूळ इंग्रजी ट्विट
“Which Ambedkar ??? The one who drafted a cross law and constitution or the one who spread the disease called reservation in the country,” Pandya purportedly posted on his twitter timeline .
याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांच्या मते, २६ डिसेंबर २०१७ ला हार्दिक पांड्यानं स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. ज्यात त्यानं डॉ. आंबेडकरांचा अपमान केला होता. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.