Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अप्रतिम लेख - लव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या

लव्ह सेक्स आणि गर्भनिरोधक गोळ्या
त्याने 11 वी लाच प्रपोज केलेले . पण मी त्याला हो म्हटले नाही . हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा नाही असे नाही. मलाही तो आवडायचा. १२ वी झाली, कालांतराने आमच्या दोघांचाही एकाच इंजिनियरींग college ला नंबर लागला. योगायोग असा की faculty सुध्दा एक व class सुध्दा एक.  जसे जसे शरीर वाढत होते तसतसे आता हळूहळू दोघातले बोलणे वाढले , संपर्क वाढला , जवळीक वाढली. मी जाणीवपूर्वक त्याला आता माझा होकार दर्शविला. प्रेमाच्या शपथा - आणाबाका घालून झाल्या . लग्नाची वचन देवून झाली.
माझ्या होकाराने त्याला आता माझ्या शरीराला व मला त्याच्या शरीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. शरीरातील अवयवांत जसजसा chemical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली. आता आम्ही सोबत फिरायचो, बाईक शेअर करायचो , corner seats घेवून movies ला जायचो. हातात हात घेणे, मिठी मारणे , किस करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची शरीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती. 



साहजिकच त्याचाच whatsapp ला message आला ....
" येतेस का आज रात्री रूमवर ? "
मीही थोडासा नकार देत शेवटी होकार दर्शविला. मलाही whatsapp ला केलाला phone_sex , practically अनुभवायचा होता. आम्ही condoms चा वापर करून त्या रात्री इंटरकोर्स केला. अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या. एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत condom नं वापरताच इंटरकोर्स केला . दोघांच्याही शरीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही . नंतर चूक जाणवली. मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच गर्भनिरोधक गोळी घेतली. तो बोलत होता. काही होत नाही , घाबरू नकोस . पण मला MC (पाळी) येईपर्यंत भिती वाटतच होती. एकदाची पाळी आली . व गर्भनिरोधक गोळ्यांवर डोळेलावून विश्वास बसला. 


आता आम्ही without Condoms इंटरकोर्स करायला लागलो . कारण त्यात जास्त आनंद मिळायचा. Sex नंतर किंवा आधी एक गोळी घ्यायची आणि बिंधास्त राहायचं. आमची दोघांच्या सहवासातली इंजिनियरींची ४ वर्षे आणि ME ची २ वर्षे अशीच एकमेकांच्या शरीराची भूक भागवत sex व गर्भनिरोधक गोळ्यांच्या सहवासात , प्रेमाच्या आधुनिकीकरणात निघून गेली. 





शपथा घेतल्या , त्याप्रमाणे लग्नही केलीत.
आता मात्र आमच्यातील शारीरिक संबंधांना समाजमान्य लायसन्स मिळालं. परंतु परत family planning च्या नावाखाली गर्भनिरोधक गोळ्या ह्या college च्या bag पासून लग्नानंतर ही सोबतच होत्या.
आता लग्नाला 2 - 3 वर्षे होऊन गेली होती. घरच्या मोठ्यांना बाळाचा आवाज ऐकायचा होता.
आम्ही दोघांनी खूप प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती . शेवटी doctor चा सल्ला घेतला , चेकअप केले .
doctor चे reports आले --
मी कधीही आई होनार नव्हते . Sex च्या दुनियेत मनसोक्त वावरताना याची मला जराही कल्पना नव्हती.
आता मला बाळंतपणाच्या नाहीत तर वांझोटोपणाच्या कळा येत होत्या. पोटातील गर्भपिशवीच काढून टाकावी लागणार होती. 


मला थोडीही कल्पना नव्हती--
"क्षणिक शरीराच्या सुखासाठी नकोत्या वयात नको त्या वैज्ञानिक सुखसुविधांचा उपयोग घेऊन मी वांझोटेपणाला माझ्या गर्भात वाढवत असल्याची. "


लेखक - सुधीर त्र्यें. पाटील