छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या चिंदम ह्यांनी अशी मागितली माफी !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे . तरीपण आज भाजपा अहमदनगर येथील भाजपा पक्षाचे नेते आणि अहमदनगर या जिल्ह्याचे उपमहापौर श्री श्रीपाद छीदम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
घडले असे कि उपमहापौर यांच्या प्रभागातील काही कामांसाठी ते कर्मचाऱ्यांची मागणी करत होते . पण सारखी सारखी कर्मचारी पाठवण्यास टाळाटाळ केल्याने आज सकाळी त्यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी असलेले अशोक बिडवे यांना त्यांनी फोन केला . कर्मचारी वेळेवर न पाठवल्याने त्यांनी अशोक बिडवे यांना चांगलेच झापले . काय बोलले होते नक्की उपमहापौर
तेव्हा अशोक बिडवे यांनी कारण दिले कि शिवजयंती जवळ आल्याने कर्मचारी त्यामध्ये व्यस्त असल्याने ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही . त्यानंतर उपमहापौर आणखी भडकले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बद्दल आक्षेपार्ह विधान करायला लागले . त्या कर्मचाऱ्याने उपमहापौरास विनंती पण केली कि असे काही बोलू नका पण तेव्हा उपमहापौर हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसावे .
या सर्व संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे . उपमहापौरांच्या अशा वक्तवव्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . उपमहापौर यांच्या ऑफिसवर दगडफेक करण्यात आली . ऐका
या घटनेनंतर उपमहापौर यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे त्या संबंधितचा विडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे . पण उपमहापौर अजून पण फरार झाले आहेत .
या घटनेनंतर उपमहापौर यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे त्या संबंधितचा विडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे . पण उपमहापौर अजून पण फरार झाले आहेत .