आज होणार खुलासा - कुत्रे नेहमी गाडीच्या मागे का पळतात ?
रात्रीच्या वेळी तुम्ही जेव्हा गल्लीतून जाता तेव्हा लगेच कुत्रे भुंकायला लागतात . बऱ्याचदा कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे पळत असतील . तुम्ही कारमध्ये असले तर सुरक्षित तरी राहाल पण मोटारसायकलवर असाल तर भीती वाटण साहजिक आहे . मागे लागलेल्या कुत्र्यांपासून कसा पिच्छा सोडवावा .
दुर्घटनेच्या शक्यता असतात
बऱ्याचवेळा कुत्रे चालत्या गाडीच्या समोरून येऊन पाठलाग करतात . बऱ्याचवेळा तुमचा कंट्रोल जातो आणि ऍक्सीडेन्ट होऊन जातो . बऱ्याचवेळा कुत्रे गाडीखाली येऊन जातात . तरीपण ते त्यांची सवय नाही सोडत .
स्वभावच तसा आहे
कुत्र्यांनी आपल्या गाडीच्या मागे पालन ही त्यांची सवय आहे आणि स्वभाव पण आहे . ते या गोष्टीला कंट्रोल नाही करू शकत . कुत्र्यांची गाडीशी कुठल्याही प्रकारची शत्रुता नसते . उलट ते गाडीचा लाईट आणि गाडीच्या वेगाने घाबरून जातात . एका शोधानुसार कुत्र्यांना गावीच वेग आणि त्याच्या आवाजापासून धोका वाटतो .
गाड्यांच्या मागे पळणे खेळासारखे आहे
कुत्र्यांचा एक साधा स्वभाव आहे कि कुठल्याही गोष्टीच्या मागे पळणं . तुम्ही घरातील कुत्र्यांचे निरीक्षण केले असेल कि ते कुठलीही गोष्ट फेकल्यावर लगेच त्याच्या मागे धावतात . वस्तूंच्या मागे धावणं हा त्यांच्या खेळाचा एक भाग आहे . म्हणून कुठलीही धावती गाडी दिसल्यावर लगेच त्यासोबत खेळायला लागतात .
हैराण करेल हा खुलासा
तुम्ही ही म्हण ऐकली असेल कि इलाका कुत्तो का होता है . जर ऐकली असेल तर ह्या म्हणीला कुत्र्यांच्या या सवयीला जोडू शकतात . तुम्ही कुत्र्यांना गाडीच्या टायर वर लघवी करताना पहिले असेल . कुत्रे फक्त आपल्या भागातील गाडीच्या टायरांवरच लघवी करतात . जेव्हा दुसऱ्या भागातील गाडी त्यांच्या भागातून जाते तेव्हा ते त्यांच्या मागे धावतात .
सावधान राहा
मोटारसायकल चालवणार्यांना रात्रीच्या वेळी सावधान राहून गाडी चालवणे खूप गरजेचे आहे . तुम्ही जनावरांकडून अपेक्षा नाही करू शकत कि त्यांना चांगलं आणि वाईट यातला फरक कळत असेल . चावणं त्यांचा स्वभाव आहे आणि भुंकणे त्यांची सवय आहे . त्यामुळे कुत्र्यांच्या भागातून जाताना गाडी थोडी हळू चालवा . आता तुम्हाला समजले असेल कि कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे का धावतात .