ट्रक ड्रायव्हरचा मुलगा खेळणार आयपीएल - बघा त्याचा सुंदर प्रवास !
आयपीएल सीजन ११ साठी खेळाडूंची निलामी पूर्ण झाली आहे . ज्यांना कोणी ओळखत पण नव्हते ते रातोरात स्टार झाले आहेत . असाच एक ट्रक ड्राइवरचा मुलगा आहे . त्याचे नाव आहे तेजेंदर सिंह ढिल्लन . याला मुंबई इंडियन्सने ५५ लाख रुपयाची बोली लावून विकत घेतले आहे . तेजेंदर यांनी राजस्थानसाठी रणजी क्रिकेटमध्ये खेळले आहेत .
पिता आहेत ट्रक ड्रायव्हर
मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेले तेजेंदर यांचे वडील कैलास हे एक ट्रक ड्रायव्हर आहेत . त्यांची आई सरबजीत ही एक गृहिणी आहे . त्यांना तीन बहीणीदेखील आहेत . त्यात दोन बहिणींचे लग्न झाले आहे आणि एक अविवाहित आहे . तेजेंदरचे वडील ट्रक चालवतात त्यातून जी काही कमाई होते त्यातूनच त्यांचे घर चालते .
काकांनी उतरवले क्रिकेटच्या मैदानात
तेजेंदरची प्रतिभा बघून त्याच्या काकांनी त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरवले तेव्हा तेजेंदर फक्त आठ वर्षांचे होते . तेजेंदरचे काका जीत सिंह पण रणजी खेळले आहेत .
ऑलराउंडर आहेत तेजेंदर ढिल्लन
तेजेंदर ढिल्लन राजस्थानकडून रणजी ट्रॉफीसाठी खेळतात . याआधी ते विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे . ते फलंदाजीबरोबरच गोलंदाजी पण चांगली करतात . त्यांचे आता एकच स्वप्न आहे कि आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करावे . म्हणजे मग लवकरच त्यांना देशासाठी खेळण्याची संधी मिळेल .
आयपीएलमधील आवडती टीम
आक्रमक फलंदाजीबरोबर गोलंदाजी करणारे तेजेंदर ढिल्लन यांनी सांगितले कि आयपीएलमधील आपल्या आवडत्या टीममध्ये आपल्याला स्थान मिळाले आहे . यामुळे ते खूप खुश आहेत . मी सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटमधील देव मानतो . मी खूप नशीबवान आहे कि मला त्यांच्या देखरेखीखाली खेळायला मिळणार आहे .
मिळाली ५५ लाखांची रक्कम
आयपीएलमध्ये तेजेंदर सिंह यांना मुंबई इंडियन्सने ५५ लाखात विकत घेतले आहे . तेजेंदर सिंह एवढी मोठी रक्कम मिळाल्याने खुश आहेत . त्यांनी सांगितले कि या पैशाने ते त्यांच्या घरच्यांसाठी एक सुंदर घर बनवणार आहेत ज्यात ते आपल्या कुटुंबासोबत राहू शकतील .
चांगल्या प्रदर्शनाची आहे आशा
तेजेंदर यांच्या आई सरबजीत कौर यांनी सांगितले कि ज्या तर्हेने त्यांच्या मुलाने मेहनत केली आहे त्यामुळे त्यांना पूर्ण विश्वास आहे कि आयपीएलमध्ये त्यांचा मुलगा चांगला खेळेल .
आयपीएल टूर्नामेंट
आयपीएल ६ एप्रिलपासून सुरु होणार आहे . मागची टूर्नामेंट मुंबई इंडियन्सने जिंकली होती . यावेळेला ही टीम ट्रॉफी वाचवण्यासाठी उतरेल . मुंबई टीममध्ये यावेळेला रोहित शर्मा ,पंड्या ब्रदर्स , जसप्रीत बुमराह ,किरेन पोलार्ड सारखे उत्तम खेळाडू आहेत .