Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

या तुरुंगाच्या बिर्याणीला आहे प्रचंड मागणी मासिक उत्पन्न ऐकून थक्क व्हाल !



सामान्यपणे तुरुंगातील जेवण चांगलं म्हटलं जात नाही पण या धारणेला केरळच्या कनूर  मध्य कारागृहाने बदलून टाकले आहे . येथे कैद्यांच्या कलेला वाव देऊन त्यांना सुधारले जाते . या तुरुंगात एकूण १२०० कैदी आहेत . येथील बिर्याणी,पोळ्या ,बेकरीचे पदार्थ ,लाडू यांसारख्या यांसारख्या  पदार्थांना बाहेर खूप मागणी आहे . या तुरुंगाचे मासिक उत्पन्न एक कोटीपेक्षा पण जास्त आहे . कनुरव्यतिरिक्त विजयुर आणि पुजापुरा येथे पण हे उद्योग चालतात . येथे कैद्यांना २०० रोज मिळतात .

तुरुंगाच्या पोळ्या बाजारात विकण्याचा व्यवसाय




२०१२ मध्ये एक प्रोजेक्टच्या हेतूने हे काम सुरु केले होते कि तुरुंगात बनणाऱ्या पोळ्या बाजारात विकल्या जाव्यात . त्यांचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला . कारण तुरुंगातील कैदी खूप चांगल्या पोळ्या बनवतात . त्यांच्या हाताने बनवलेल्या पोळ्या आणि बिर्याणीसारख्या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे .

ओळख बदलण्याची मोहीम




२००९ मध्ये कैद्यांच्या बेकायदेशीर गतिविधींमुळे छापा मारला गेला होता . ज्यात बरेचशे बेकायदेशीर सामान जप्त करण्यात आले होते . त्यानंतर तुरुंगाने आपली प्रतिमा बदलण्यासाठी ही नवीन मोहीम सुरु केली . ज्या कैद्यांना स्वयंपाक बनवता येत होता त्यांना स्वयंपाकघराच्या ड्युटीवर लावून दिले . ज्या कैद्यांना बेकरीचे काम येत होते त्यांना बिस्कीटपासून ते ब्रेड बनवण्याचे काम सोपवण्यात आले .

सुरुवातीला तुरुंगात खपवले




सुरुवातीच्या काही महिने हे फक्त तुरुंगापुरतीच मर्यादित होते . त्यानंतर २०१२ मध्ये पहिल्यांदा तुरुंगातील पोळ्या बाजारात विकण्याचे काम सुरु करण्यात  आले . हळूहळू त्याची मागणी वाढत गेली त्यानंतर तुरुंगात पोळ्या    बनवण्यासाठी मशीन लावले गेले .

स्वस्त जेवण




केरळच्या तुरुंगातील बनणाऱ्या खाण्याच्या पदार्थांना फ्रिडम फूड या ब्रॅण्डच्या नावाने बाजारात विकले जातात . स्वस्त असल्याने पोळ्या आणि बिर्याणी पासून ते अंडा करी पर्यंत सगळ्यांना प्रचंड मागणी आहे . गेली सहा वर्षात तेथील सरकारची ८. ५  कोटींची कमाई झाली आहे . गतवर्षी या सरकारने ३ कोटी रुपये कमावले आहेत .

साफसफाईकडे विशेष लक्ष




तुरुंगात तयार होणाऱ्या खाण्यात जेवणात साफ सफाईकडे विशेष लक्ष दिले जाते . जेवण बनवल्यानंतर त्याला व्यवस्थित पॅक केले जाते . त्यानंतर त्याला बाजारात उतरवले जाते . बाजारमूल्यापेक्षा थोड्या कमी किमतीत मिळत असल्याने आणि चव अगदी घरच्या सारखी असल्याने ते खूप लोकप्रिय झाले आहे .

श्रीलंकेच्या कैद्यांबरोबर क्रिकेट मॅच




केरळ तुरुंग प्रशासन कैद्यांच्या मनोरंजनाची पूर्ण काळजी घेते . त्यांना क्रिकेट खेळण्यापासून इतर गोष्टींमध्ये भाग घेण्याचा पूर्ण अवसर देतात . नवीन   वर्षाच्या प्रसंगी श्रीलंकेतील कैद्यांची टीम बोलावून टी -२० मॅचचं आयोजन केलं गेलं होत .

पाच तुरुंग मिळून एक टीम




केरळच्या पाच तुरुंग मिळून एक संघ तयार करण्यात आला होता . त्यानंतर दोन संघांच्या मध्ये स्पर्धा ठेवण्यात आली . केरळचे कैदी आणि श्रीलंकेचे कैदी यांमधील मॅच बरीच चर्चेत होती . लोक त्याची स्तुती करत होते .