नवर्याचे IPL निलामीच्या दरम्यान झालेले हाल बघून बायको अँकरने हि भावना व्यक्त केली !
आयपीएलच्या नीलमीच्या दरम्यान प्रत्येकाची नजर मोठ्या खेळाडूंवर होती . बऱ्याच खेळाडूंवर आश्चर्यकारक बोली होती . या निलमीच्या दरम्यान एका अशा खेळाडूची बोली लागली ज्याची पत्नी आयपीएलच्या नीलमीच्या दरम्यान स्पोर्ट्स चॅनेलवर अँकरिंग करत होती . तुम्हाला वाचून कदाचित हे विचित्र वाटत असेल पण हे सत्य आहे . आम्ही बोलत टीव्ही अँकर मयंती लैंगरविषयी जिचे पती स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्स ने ५० लाखात विकत घेतले .
मोहक अँकर
मयंती लैंगरला कुठल्याही ओळखीची गरज नाही . ती क्रिकेट आणि फुटबॉलची स्टार अँकर मानली जाते . मयंतीने कर्नाटकचा ऑल राउंडर स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे . आयपीएल नीलमींमध्ये बिन्नीच पण नाव समाविष्ट होत . त्यांनी त्यांची किंमत ५० लाख रुपये ठेवली होती . याच किमतीवर राजस्थान रॉयल्सने त्यांना विकत घेतले .
मागीलवर्षी विराटच्या टीममध्ये होते
स्टुअर्ट बिन्नी मागीलवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळले होते . पण यावर्षी विराटच्या टीमने त्यांना परत घेतले नव्हते . त्यामुळे त्यांना निलामीत सामील व्हावे लागले . २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या यशामध्ये बिन्नीने शानदार प्रदर्शन केले होते .
मागील वर्षी खास नाही
स्टुअर्ट बिन्नीसाठी मागील वर्ष काही खास नव्हते गेले . त्यांनी ८ मॅचमध्ये फक्त ७८ रन बनवले होते आणि ४ विकेट घेण्यात त्यांना यश आले होते . याचा परिणाम त्यांच्या टीमवर पडला होता .
पत्नीने घेतली होती मुलाखत
मागील वर्षी कर्नाटक प्रीमियर लीगच्या एका मॅचच्या दरम्यान मयंती लैंगरने पहिल्यांदा आपल्या पती स्टुअर्ट बिन्नीची मुलाखत घेतली होती . ती मुलाखत त्यांच्यासाठी खास होती कारण त्यादिवशी त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता .
फुटबॉलपट्टू होती मयंती
मयंती लैंगर जेव्हा ९ वर्षांची होती होती तेव्हा तिचे वडील लेफ्टनंट जनरल संजीव लैंगर यांची पोस्टिंग यूएनच्या हेड्क्वाटर्स मध्ये होती . म्हणून मयंतीचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क मध्ये झाले आहे . ती लोकल पार्कमध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळायची . सुरुवातीला ती गोलकिपर होती पण नंतर ती टीमची मुख्य खेळाडू म्हणून वर आली होती .
दिल्लीला परतल्यानंतर पण फुटबॉल प्रेम राहिले चालू
अमेरिकेतून परतल्यानंतर मयंतीचे फुटबॉल प्रेम हे तसेच होते . त्या एका लोकल फुटबॉल अकादमीमध्ये सामील झाल्या . दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये पदवी घेत असताना त्यांनी स्वतःला खेळाशी जोडून ठेवण्यासाठी स्पोर्ट्स अँकरिंग सुरु केले . यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली .
मुलाखतीपासून सुरु झाली प्रेमकथा
मयंती आणि बिन्नीची प्रेमकहाणी पण खूप सुंदर आहे . दोघांची पहिली भेट आयपीएलच्या मुलाखतीदरम्यान झाली होती . मॅच संपल्यानंतर होणाऱ्या मुलाखतीदरम्यान बिन्नी मयंतीवर फिदा झालं होते . जवळपास एक वर्ष डेटिंग केल्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न करून घेतले . बिन्नी टीम इंडियासाठी पण खेळले आहेत . पण खेळात प्रगती न झाल्याने त्यांना टीममधून बाहेर काढण्यात आले .