Loading...

कथा वर्षाकाठी ५ कोटी रुपयांचे खेकडे निर्यात करणाऱ्या खेकड्याच्या मावशींची !

आज आम्ही तुम्हाला सांगणार अहो यशॊगाथा ६० वर्षीय गुणाबाई सुतार ह्यांची ! त्या तब्बल ५ कोटी रुपयांचा खेकडे विकण्याचा वार्षिक व्यापार करतात आणि विशेष म्हणजे त्या फक्त १ली पर्यंतच शिकल्या आहेत पण आयुष्याच्या शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर आज त्यांनी व्यापार मध्ये उत्तुंग नाव मिळवले आहे !

कोणताही व्यवसाय करण्यासाठी फक्त उच्चशिक्षित होण्याची गरज नाही त्यासाठी हवी एक जिद्द ,उर्मी ! आपणही काही करू शकतो . मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपण शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो हा अंगी आत्मविश्वास असल्याचे दाखवून दिलंय नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार या महिलेने. महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त नैसर्गिकरित्या खेकड्यांचे उत्पादन करणारं राज्य आहे. याचाच फायदा घेत गुणाबाईंनी खेकड्यांची निर्यात करत परदेशातील बाजारपेठ गाठली आहे.

Gunabai Sutar Crab Export

शिक्षण फक्त पहिली…पण वयाच्या 8 व्या वर्षांपासून खेकडे पकडण्यात त्या अगदी पारंगत .कारण ते सोपे काम नसते गेल्या ४० वर्षापासून गुणाबाई नवी मुंबईतील खाडी किनार्‍यावर फळीवरुन खेकडे पकडून मुंबईत विकायच्या…सुरुवातीला सव्वा रूपयात एक डझन खेकडे विकणारी गुणाबाई आज वर्षांकाठी 5 कोटी रुपयांची खेकड्यांची निर्यांत करते. विशेष म्हणजे वडील पती भावंड या कोणाची साथ नसताना ही मजल गुणाबाईने गाठलीये.आज गुणाबाई 100 ग्रँमचे कच्चे खेकडे घेवून तीन किलोचे पक्के खेकडे तयार करते. तेव्हा त्यांना एका किलो मागे 30 डॉलर मिळतात.
Gunabai Sutar Crab Export
नवी मुंबईतील खाडी किनार्‍यालगत असलेल्या तलावात गुणाबाई राज्यभरातील कच्चे खेकडे सोडून पारंपरिक पद्धती हा व्यवसाय करतात. यातून त्यांना 4 महिन्यात अडीच ते तीन किलोचे पक्के खेकडे मिळतात आणि नंतर याच खेकड्यांवर स्वत:च्या कोल्डस्टोरेजमध्ये प्रक्रिया करून निर्यात केली जाते. महाराष्ट्रातला 100 टन खेकड्याचा कच्चा माल आंध्रप्रदेशात जात होता. आणि तिथे खेकडे पक्के करून चेन्नई मार्गे निर्यात होत होती. पण आता या पैकी 70 ते 80 टन खेकडा गुणाबाई आणि तिचा मुलगा सुभाष निर्यात करतात.

आज आपल्या सर्व किनारपट्टीवर खेकड्यांच्या उत्पादनाला पोषक वातावरण आहे. नवी मुंबईतील पाचशे तलावांची एमपेडाच्या माध्यमातून पाहणी झालीये. या सर्व तलावातून शेकडो टन खेकड्याच उत्पादन होवू शकतो. जर महाराष्ट्र सरकारने तामिळनाडू सरकार प्रमाणे सुविधा दिल्यातर महाराष्ट्र खेकडे निर्यातीमध्ये अव्वल स्थानी असेल. कारणं परदेशात महाराष्ट्रातल्या खेकड्यांना मागणी आहे. यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारही नवीन संधी उपलब्ध होईल.

विचार करा ....देश घडावा