श्रीनगर मधे फडकवला तिरंगा - फारुख अब्दुलाच्या आव्हानाला शिवसेनिकांचे प्रत्युत्तर !
तिरंगा फडकवायला गेले शिवसैनिक झाली अटक
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवताना शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक कारणात आली आहे . स्थानीय प्रशासनाने घंटा घर च्या जवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले . हे शिवसैनिक तेथील माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या दिलेल्या आवाहनानंतर लाल चौकात तिरंगा फडकवायला आले होते . तेव्हा त्यांना अटक केली गेली.
फारुख अब्दुल्ला ने काही दिवसापूर्वी केंद्र सरकारला आवाहन देत म्हटले होते कि केंद्र सरकारने पीओके वर तिरंगा फडकावून दाखवावे . या प्रतिक्रियेनंतर शिवसैनिकांनी हे पाऊल उचलले होते . याच्या आधी शिवसेनेचे(बाळासाहेब ठाकरे असताना) राज्यप्रमुख डिम्पी कोहली आणि महासचिव मनीष सहानी यांनी म्हटले होते कि शिवसेना लाल चौकात बुधवारी तिरंगा फडकावेल . संवाददाता संमेलनात कोहलींनी सांगितले होते कि शिवसेनेचे एक विशेष दल काश्मीरला जाऊन आले आहे .
सध्या ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना कोठींबाग पोलीस स्टेशनच्या तुरुंगात ठेवले आहे . अटक केलेल्यांची नावे अश्विनी गुप्ता,मुनीश गुप्ता,नागपाल चौधरी,राज सिंह,भुवन सिंह,संजीव सिंह,राजीव सलरिया,विकास आणि सोनी सिंह ही आहेत . हे सर्व जम्मू चे रहिवासी आहेत . पण हे सर्व कट्टर शिवसैनिक आहेत . या घटनेमुळे श्रीनगरचे वातावरण खूप तापले आहे .
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि फारुख अब्दुल्ला ने २७ नोव्हेंबरला मोदींच्या केंद्र सरकारला आवाहन दिले होते कि त्यांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायच्या गोष्टी करण्याआधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून दाखवावा .आता बघायचे हे आहे कि मोदी सरकार यावर कोणते पाऊल उचलते.