बघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने !
कलेक्टरची गाडी चालवणारा ड्रायव्हर दिगंबर याने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल कि त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कुठला कलेक्टर स्वतः ड्रायव्हर बनून सन्मानित करेल. ही घटना घडली आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील . घडले असे कि श्रीकांत हे अकोला जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर आहेत . त्यांचा ड्रायव्हर दिगंबर आहे . तो दिगंबरचा सरकारी नोकरीचा शेवटचा दिवस होता . तो घरी बसलेला असताना अचानक श्रीकांत साहेब त्याच्या घरी आले . स्वतः डेप्युटी कलेक्टर गाडी चालवून आले होते . त्यांना बघून दिगंबर आणि त्याच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला .
इतकेच नाही तर श्रीकांत साहेब त्याला म्हणाले कि आज तुझ्या निवृत्तीचा दिवस आहे . यामुळे आज मी गाडी चालवणार आणि तू साहेबासारखा मागे बस . दिगंबर म्हणाला साहेब माझी इतकी लायकी नाही आहे . तेव्हा कलेक्टर साहेब त्याला म्हणाले कि तू इतक्या वर्ष एवढ्या कलेक्टरची सेवा केली . आज तुझ्या सरकारी नोकरीच्या शेवटच्या दिवशी मला तुझा ड्रायव्हर बनायचे आहे . तेव्हा दिगंबर म्हणाला कि मला इतका सन्मान नका देऊ . पण कलेक्टर साहेब काही ऐकायला तयार नव्हते .
शेवटी त्यांनी दिगंबरला मागे बसवून स्वतः गाडी चालवत ऑफिसाला नेले . कलेक्टर साहेबांनी खास दिगंबरसाठी लाल दिव्याची सरकारी गाडीला गुलाब पुष्पांनी सजवून आणले होते . लोकांनी जेव्हा हे दृश्य पहिले तेव्हा खूप आश्चर्य वाटले . गाडीतून उतरताच कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना अभिवादन केले आणि म्हणाले कि आपले दिगंबर हे सरकारी नोकरीतून आज निवृत्त होत आहे . आज त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस आहे . यानंतर दिगंबर म्हणाले कि मी आत्तापर्यंत १८ कलेक्टरांकडे गाडी चालवली आहे . पण आज श्रीकांत साहेबांनी जो सन्मान मला आज दिला आहे तो मी आयुष्यभर नाही विसरू शकणार .