चुलीवरील तापलेल्या तव्यावर वाटाणे जसे ताड ताड उडतात तसे खडसे उडत आहेत - शिवसेना !
भारतीय जनता पार्टीमधे ४० वर्ष नेते म्हणून वावरणारे आणि पक्ष वाढिसाठी आपले आयुष्य वेचनारे एकनाथ खडसे ह्यांची सध्या जी ससेहोळपट राजकारणामधे होत आहे त्यावर जहरी टिका आज शिवसेनेच्या सामना ह्या मुखपत्रातून करण्यात आली आणि खड़सेना आरसा दाखवायचेच काम जणू करण्यात आले !
काय म्हणत आहे सामना ?
मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना ‘खतम’ करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. ते कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या शेजेवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत देऊन लाल दिव्याच्या पालखीत बसवावे असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय? या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना ‘खुली’ ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच.
तसेच ह्या संपादकीय मध्ये शिवसेना नेते संजय राऊत ह्यांनी ३ आठवड्यापूर्वी खडसे भाजप सोडतील ह्या विधानाची पण दाखल घेतली आहे.

'तीनच आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जळगावच्या पत्रकार परिषदेत एक सहज विधान केले होते की, ‘‘खडसे यांची सध्याची मानसिक अवस्था पाहता ते फार काळ भाजपात राहतील असे वाटत नाही.’’ यावर खडसे हे भलतेच उखडले होते व मी आजन्म भाजपातच राहणार असे ओरडून सांगत होते. तेच खडसे'
आता लक्ष नाथभाऊंच्या प्रतिक्रियेकडे लागले आहे, नेमके असे काय घडले कि शिवसेनेमध्ये नाथाभाऊ येणार अशी चर्चा असतांनाच नेमका हा अग्रलेख कसा आला आणि त्यांचे भाजपा मध्ये का असे झाले ? ह्या गोष्टींचे उत्तर काळच देईल !