राज कपूरने मुलीच्या वयाच्या सिमी गरेवाल कडून असा करून घेतला हॉट मेरा नाम जोकर !

त्यावेळेला राज कपूर मेरा नाम जोकर बनवायची तयारी करत होते . साऱ्या जगाला माहित आहे कि राज कपूर यांच्या चित्रपटात बाकी काही खास नसेल पण संगीत आणि अभिनेत्रींच्या बाबतीत ते अजिबात तडजोड करत नव्हते . खास करून ते अभिनेत्री अश्या निवडत होते कि लोक बघतच राहत होते . सीन आणि संवादाबरोबरच त्यांच्या कपड्यांची निवड पण ते स्वतः करत होते . हे आपण वैजंतीमाला पासून ते डिंपल कपाडिया पर्यंत आपण बघत आलो आहे . त्यामध्ये सिम्मी अग्रवाल पण आहे . सिम्मी लहान होत्या तेव्हा त्यांचे मित्र आवारा गर्दीश मे आसमान का तारा हू हे गाणं गात होते . तेव्हा सिमीने तिच्या वडिलांना विचारले कि त्यांचे मित्र दिवसरात्र हेच गाणं का गात असतात ? तेव्हा तिचे वडील म्हणाले कि एक दिवस त्या आवाराशी तुझी भेट करून देईल तेव्हा तुला त्याचे कारण समजेल .
एक दिवस सिम्मीचे वडील तिला आवारा चित्रपट बघायला घेऊन गेले . जेव्हा तिने चित्रपट पहिला तेव्हा ती इतकी मग्न झाली कि शो संपल्यानंतर पण चित्रपटगृहात बसून राहिली . सिम्मी तिचे शिक्षण पूर्ण करायला इंग्लंड ला गेली . तिकडनं आल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास संघर्ष करू लागली . एक दिवस त्यांनी आपला खोटं नाव सांगून राज कपूर यांना फोन केला . गप्पा इतक्या रंगायला लागल्या कि हे असं रोज व्हायला लागला . एक दिवस राज कपूर यांनी चर्चगेट जवळ तिला भेटायला बोलावले . सिम्मीने ही भेट कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांना तिने लिहिलेली कविता आणि गुलाबपुष्प भेट म्हणून दिले . ते खूप खुश झाले आणि भेटत राहा असे म्हणून निघून गेले .
सिम्मीने असे कधीच नाही दाखवलं कि तिला त्यांच्या चित्रपटात काम करायचे आहे . एक दिवस राज कपूर यांनी सिम्मीच्या घरी फोन केला तेव्हा तिच्या आईने उचलला तेव्हा ते तिकडून म्हणाले मी राज कपुर बोलतोय. सिम्मीच्या आईला आश्चर्य वाटले कि राज कपूर त्यांच्या मुलीला का भेटायला येत आहे . दुसऱ्या दिवशी ते पुष्पगुछ घेऊन भेटायला आले . तेव्हा ते म्हणाले कि तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्या मुलीला माझ्या चित्रपटात घ्यायचे आहे .
सिम्मी मेरा नाम जोकर मध्ये पहिली भारतीय नायिका बनली . हा रोल मेरी नावाच्या एका शिक्षिकेचा होता . त्या चित्रपटात त्यांच्यावर एक गाणं पण शूट करण्यात आलं होत . त्या गाण्याच्या शेवटी सूर्यास्त दाखवायचा होता . त्या एका सीनसाठी त्यांना १४ दिवस लागले . त्यांनतर एक जबदस्त पार्टीचे आयोजन केले होते . सिमी गरेवाल चर्चेत राहिली ती मेरा नाम जोकर मुळेच आणि त्यात दिलेल्या न्यूड सीन्स मुळे !