अमिताभ साठी बाल कलाकार म्हणून काम केलेला हा अभिनेता आहे अमिताभ हुन श्रीमंत !
कुली हा चित्रपट फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला नव्हता . तर बच्चन यांच्या लहानपणीचा रोल करणारे रवी हे पण सर्वांच्या मनात घर करून बसले होते . त्या काळात लोक या मुलाला मास्टर रवी या नावाने ओळखत होते . मोठे झाल्यावर मास्टर रवीने आपले नाव बदलून रवी वलेचा असं ठेवून घेतलं . तस तर आपण याआधी पण काही बालकलाकारांविषयी वाचलं असेल जे बॉलिवूडमधून बाहेर पडताच एकांतात निघून गेले . काहींची अवस्था तर इतकी खराब होती कि त्यांना नीट आयुष्य पण जगता नाही आले . पण रवी वलेचा यांनी स्वतःच या मायानगरीला सोडून गेले आणि आता अशा प्रकारे आपले आयुष्य जगत आहेत .
४० वर्ष जुनी गोष्ट
आपण 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटात हा बाल कलाकार पाहिला आहे. हा सुपर हिट चित्रपट 1977 मध्ये रिलीज झाला होता . आता या चित्रपटाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत . या चित्रपटात रवीने अमिताभ बच्चन यांच्या बालपणाची भूमिका बजावली होती .
रवीला मिळाले बरेच चित्रपट
केवळ अमर अकबर अँथोनी मध्ये नाही तर १९८३ मधील अमिताभ बच्चन यांच्या कुली चित्रपटात 'कुली' म्हणूनही त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणाची भूमिका निभावली होती . या चित्रपटानंतर रवीसमोर चित्रपटांची लाईनच लागली .
३०० पेक्षा जास्त चित्रपट करूनही आहेत गुमनाम
कुलीच्या यशानंतर मास्टर रवीला सर्व लोक जुनियर अमिताभ म्हणून ओळखू लागले . रवीने आपल्या आयुष्यात ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे . पण आता तो या दुनियेपासून दूर आहे .
शशी कपुरशी होते खास नाते
रवीला बॉलिवूडमध्ये आणणारे शशी कपूर होते . रवी जेव्हा ४ वर्षाचे होते तेव्हा शशी कपूर यांनी त्याला आपल्या फकिरा या चित्रपटात बालकलाकारची संधी दिली होती .
या क्षेत्राला निवडले
रवीने आपलं करियर बनवलं आणि आता करोडोंमध्ये खेळत आहे . नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपली कंपनी सुरू केली.