पर्सनॅलिटीच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे अजय देवगणचा भाऊ !
बॉलिवूडमध्ये असे बरेचशे कलाकार आहेत जे खूप वाईट परिस्थितीतून वर आलेले आहेत . उसाचं पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे . बॉलिवूडमध्ये काही असे पण कलाकार आहेत ज्यांचा रंग सावळा असून पण ते उच्चं स्थानी पोहोचले . आज आपण अशाच एका कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत . ज्याने आपल्या मेहनत आणि कष्टाच्या जोरावर हे सर्वोच स्थान प्राप्त केले आहे .
आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडचे सिंघम अजय देवगणविषयी . आज अजय देवगणला बॉलिवूडमध्ये काम करून आता २६ वर्ष झाली आहेत . अजयने आपल्या संपूर्ण करियरमध्ये ८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे . अजय देवगणने विनोदी साहसपट रहस्यपट अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे . अजय यांनी आपल्या अभिनयातील करियरची सुरुवात १९९१ मध्ये केली होती . त्यांचा पहिला चित्रपट होता फुल और कांटे जो एक एक्शन चित्रपट होता .
आज आम्ही तुम्हाला अजय देवगणच्या भावाविषयी सांगणार आहोत . अजयच्या भावाचे नाव अनिल देवगण आहे . ते अगदी अजयसारखे दिसतात . अनिल देवगण हे चित्रपटात अभिनय नाही करत पण ते एक दिग्दर्शक आहेत आणि एक उत्तम कथा लेखक पण आहे . पर्सनॅलिटीच्या बाबतीत अनिल हे अजयपेक्षा अजिबात कमी नाही आहे . उलट ते अजयला टक्कर देऊ शकतात इतकी चांगली पर्सनॅलिटी आहे . त्यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेचशे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत . सन ऑफ सरदार ,हाल ऐ दिल ,ब्लॅकमेल ,राजू चाचा यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे . त्यांना जास्त प्रकाशझोतात यायला नाही आवडत .