या ५ राशीच्या लोकांपासून सावध रहा .. रागाच्या बाबतीत आहेत सर्वांचे बाप !!!
माणसाला राग येणं हे स्वाभाविक आहे . खूप कमी लोकांचे आपल्या रागावर नियंत्रण असते . बाकी लोकांचा अशा परिस्थितीत आपल्या मनावर ताबा राहत नाही . या जगात असा कुठलाच माणूस नाही ज्याला राग येत नसेल . काही लोकांना गरजेपेक्षा जास्त राग येतो पण हे त्यांच्या लक्षातच येत नाही . प्रत्येक माणसाच्या रंगाची पद्धत वेगळी असते . आज आम्ही तुम्हाला अशा ५ राशींबद्दल सांगणार आहोत . यांना इतका राग येतो कि आपण विचार पण नाही करू शकत . चला मग जाणून घेऊया या राशींविषयी ........
१. वृषभ रास
रागाच्या बाबतीत वृषभ राशीचे लोक खूप हिंसक असतात . यांचा स्वभाव खूप हट्टीपणाचा असतो . आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात . जर त्यांचे कोणी ऐकत नसेल तर ते खूप तापून जातात . पण एक मात्र आहे कि त्यांच्या रागाचे कारण हे बरोबर असते . पण तरीसुद्धा त्यांचा राग सगळ्यांवर भारी पडतो .
असा करा सामना
जर तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांचा राग सहन करावा लागत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचा विरोध करण्यापेक्षा त्यांच्यापासून दोन हात लांब राहावे . कारण त्यांना नेहमी घाई असते . त्यामुळे त्यांना एकटं सोडणंच योग्य राहील .
२. वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना पण खूप राग येतो . पण ते आपल्या रागावर ताबा ठेऊ शकतात . ते लवकर आपला राग लोकांसमोर व्यक्त नाही करत . पण वेळ आल्यावर कोणाचा अपमान कसा करावा हे त्यांना चांगलं माहिती आहे .
असा सामना करावा
जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्यांच्याशी भांडण्याऐवजी त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करावा . ते राग शांत झाल्यावर आपल्या रागाचे कारण नक्की सांगतील .
३. सिंह रास
सिंह राशीचे लोक आपला अधिकार गाजवण्यासाठी राग करतात . त्यांच्या रागापुढे सगळ्यांना शांत बसावं लागत . हे लोक स्वतःला वरचढ सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात . बऱ्याचवेळा आरडा ओरडा करून अक्ख घर डोक्यावर घेतात .
असा करावा सामना
सिंह राशींचे लोक अभिनय उत्तम करतात . तुम्ही त्यांना त्यांची चूक दाखवून देऊ शकतात . जर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात तर मग काहीच हरकत नाही .
४. धनु रास
धनु राशीचे लोक रागात कहर करून टाकतात . हे रागात कोणाचेही मन दुखवू शकतात . त्यांना माणसापासून सैतान बनायला जास्त वेळ नाही लागत . ते समोरच्याला तुच्छ लेखण्यासाठी काहीही बोलू शकतात .
असा करावा सामना
जेव्हा त्यांना राग आला असेल तेव्हा आपण शांत राहायचे . त्यांच्यात एक सकारात्मक गुण हा आहे कि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव लवकर होऊन जाते . म्हणून राग शांत झाल्यावर ते तुमच्याशी माफी मागायला पण मागेपुढे नाही बघत .
५. मकर रास
मकर राशीचे लोक शक्यतो नेहमी शांत असतात . पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते जीवघेणे सिद्ध होतात . ते समोरच्याला आपल्यापेक्षा लहान सिद्ध करण्यासाठी कुजल्याही थराला जाऊ शकतात .
असा करा सामना
तसे बघायला गेले तर मकर राशीचे लोक खूप जवाबदार असतात . पण त्यांचा राग हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे . अशावेळी तुम्ही त्यांचा राग शांत करण्यासाठी मदत करा .