अटलजींबद्दल ह्या १५ गोष्टी तुम्हाला नक्की महित नसतील ! - अटल बिहारी वाजपेयी वाढदिवस विशेष
आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे . भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना तुम्ही एक पंतप्रधान,उत्कृष्ट वक्ता आणि एक राजनेता म्हणून तुम्हाला माहिती आहे . पण त्यांच्या जीवनाशी निगडित अशा पण काही गोष्टी आहेत ज्या कोणाला माहित नाही . जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी निगडित काही रोचक गोष्टी .
१. भारत देशातील सर्वात मोठा सन्मान असलेला भारतरत्नाने त्यांना सन्मानित केले आहे .
२. लहानपणापासून इंग्रजांच्या कायद्याविरुद्ध लढल्याने अनेक वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले .
३. भारत छोडो या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता .
४. संघाची पत्रिका चालवण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण सोडले होते .
५. श्याम प्रसाद यांच्याबरोबर काश्मीरमध्ये आमरण उपोषणास बसले होते .
६. त्यांच्या जवळची लोक त्यांना बापजी या नावाने हाक मारत होते .
७. ते १० वेळा लोकसभा आणि २ वेळा राज्यसभेचे संसद बनले होते .
८. त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात फक्त एकदाच निवडणूक हरले आहेत .
९. संयुक्त राष्ट्रमध्ये हिंदीत भाषण करणारे ते पहिले भारतीय होते .
१०. त्यांच्या कठीण परिश्रमाने भारताला एक अणुशक्ती बनवले .
११. चार राज्यातून संसद बनलेले ते एकमात्र राजनेता आहे .
१२. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते कि अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील .
१३. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांना राजकारणातील भीष्म पिता म्हणून संबोधले होते .
१४. राजकारणात राहुंदेखील त्यांना साहित्यात विशेष रुची होती .
१५. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्रीच्या रूपात कार्यकाळ पूर्ण करणारे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षातील पहिले पंतप्रधान होते .