पोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा झाला अभिनेता, सोडले होते सर्व पण एका निर्णयाने झाला स्टार !
रेडीफ वेबसाईटला संजय मिश्रा ह्यांनी दिलेल्या मुलाखतीचे मराठी अनुवाद! मराठी अपडेटची खास भेट ..
जीवनात जिद्द असेल काही करायची उमग असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. पोटातील आग आणि मनातील जिद्द माणसाला स्वस्थ बसू देत नाही.जर तुम्ही ध्येयाने प्रेरित झालेला असाल तर अयशस्वी होण्याचा प्रश्नच येत नाही.जो प्रयत्न करतो त्याच्या मागे परमेश्वर देखील उभा राहतो. त्याची जिद्द,प्रयत्न.सचोटी पाहून त्याच्या नियतिहि प्रेमात पडते. आणि अशीच जिद्द असलेली अफलातून व्यक्ती म्हणजे चतुरस्त्र कलाकार संजय मिश्रा !
पोटासाठी ढाब्यावर टेबल पुसणारा,भाज्या आणि ओम्लेट बनवणारा हा आचारी कम वेटर ते एक यशस्वी अभिनेता हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबई मध्ये रोज हजारो लोक कलाकार बनण्यासाठी येतात, हि नुसती गर्दी नसते तर ह्यात अनेक दर्जेदार कलाकार देखील असतात पण ते ह्या स्पर्धेच्या दुष्ट चक्रामध्ये जास्त काळ टिकू नाही शकत !
९० च्या दशकात संजय मिश्रांनी चित्रपटसृष्टीत काम सुरु केले. पण सुरुवातीच्या काळात त्यांचा चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा जम बसला नाही. त्यामुळे त्यांना अभिनयातून मिळणारे उत्पन्न देखील तुटपुंजे होते. पण वडिलांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाच्या जीवावर ते परिस्थितीशी लढत होते . जेव्हा पण त्यांना हताश वाटे ते वडिलांशी सल्ला मसलत करत आणि परत जोमाने कामाला लागत. त्या काळी त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले,पण म्हणतात न नियतीच्या मनात काही भलतेच असते,अशातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
वडिलांच्या निधनाने त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली.ते नैराश्याने ग्रासल्याने ऋषिकेशला निघून गेले, तिथे त्यांनी एका धाब्यावर नोकरी सुरु केली.नेहमी ते स्वताला एकटे समजायचे. पण मनातून ते फक्त अभिनेताच होते,त्यांच्यातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देईना !विशेष असे की, यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामे केली होती. पण, त्यांना फारसे यश न मिळाल्याने कदाचीत ढाब्यावर काम करताना त्यांना कुणी ओळखले नसावे. कधी कधी ते स्वत:ही त्यांची ओळख लपवत असत. ढाब्यावर ते भाज्या आणि ऑमलेट बनवत.

दरम्यान, परमेश्वराने त्यांची ओळखली त्यावेळी रोहित शेट्टी हे ‘ऑल द बेस्ट’ चित्रपटासाठी काम करत होते. त्यांना चांगल्या कलाकाराची आवश्यकता होती. कलाकारांबाबत विचार करताना अचानक त्यांना संजय मिश्रा यांची आठवण आली. रोहित शेट्टींनी संजयचे काम पाहिले होते. तसेच, एकत्र कामही केले होते. त्यांनी संजयचा शोध घेतला. तसेच, संजयला चित्रपटाबाबतही सांगितले. पण मनाने खचलेल्या संजय मिश्रा ह्यांनी आता परत चित्रपटसृष्टीत जायचे नाही हा निर्धार केलेल्या संजयनी रोहितची ऑफर नाकारली.
रोहितनेही संजयच्या नकाराचे कारण शोधून त्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांना मनावलेच. अखेर रोहितच्या मनधरणी नंतर संजय पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तयार झाले. त्यांचा अभिनय आणि चित्रपटसृष्टीत परतन्याचा निर्णय आयुष्याला कलाटनी देऊन गेला. चित्रपटसृष्टीत परतल्यावर संजयने कधीच मागे वळून पाहिले नाही.
संजय मिश्रा ह्यांनी २००९ मध्ये लग्न केले आज त्यांचा सुखी परिवार आहे !