Loading...

आनंदी पालक-पाल्य नात्यासाठी ह्या १५ नियमांचे पालन करा !

पालक-पाल्य
१. मुलांनी चूक केली असेल तर त्यांना एकदम न रागवता समजावून सांगा तसेच माफ करा आणि त्यांनी चांगल काम केलेलं असेल तर त्यांचे नक्की काैतुक करा.
२. रात्री शक्यतो मुलांसोबतच बसून जेव्हा आणि सोबत गप्पा देखील मारा.
३. मुलांच्या आईशी वडिलांनी त्यांच्या समोर प्रेमाने आणि नीट वागावे.
४. रोज एक चांगल्या सवई बद्दल अथवा कामाबद्दल त्यांच्याशी बोला आणि त्यांना त्या साठी प्रेरित करा.
५. घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका.
६. मुलांना सारखे घालून पाडून बोलू नका नाहीतर मुलं तुम्हाला दुर्लक्षित करू लागतील.
७. मुलांसाठी नेहमी वेळ काढा, तुमच्या कडे वेळच नाही असे चित्र नका निर्माण होऊ देऊ.
८. मुलांना फक्त भविष्याचा आधार म्हणून बघू नका.
happy indian kids
९. मुलांसमोर व्यसन करू नका, त्याने त्या प्रति त्यांच्या मध्ये आकर्षण निर्माण होऊ लागते.
१०. नवीन गोष्ट घेण्याच्या निर्णय प्रक्रिये मध्ये मुलांना सामावून घ्या आणि त्या गोष्टी बद्दल त्यांना माहिती देखील द्या.
११. नवनवीन छंदांबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. पालक हेच मुलांचे पहिले गुरु, ते उत्तम भेटले तर मुलांना आयुष्यात नक्कीच सन्मार्ग सापडतो
१२. मुलांना सतत मारल्याने त्याचे दुरोगामी वाईट परिणाम दिसायला लागतात. मुले खोटे बोलायला लागतात. शक्यतो मारणे टाळावेच.
१३ मुलांना मूर्ख,गाढव अश्या शब्दांनी कधीच हाक ना मारू.
१४ तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये
१५ मुलांना चुकी केल्यावर सॉरी बोलायला शिकवावे आणि चांगले काम केले कि त्यांची प्रशंसा करावी. त्यांची गरज समजून घ्यावी.